आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - मर्सिडीझ कारने बिहार ते मुंबई प्रवास करून पंधरा दिवसांसाठी महागडे हॉटेल बुक करायचे. नंतर दिवसभर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरात बंद असलेले बंगले आणि अालिशान फ्लॅटची टेहळणी करायची. त्यानंतर रात्री ते घरफोडी करायचे. काही दिवसांंपूर्वी लाेणावळा परिसरातील रायवूड येथील कटी पतंग या बंगल्यात घरफाेडी झाली होती. या प्रकरणाचा छडा लावताना बिहारच्या दोन आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांनी दिल्लीसह मुंबईत घरफोड्या केल्याची कबुली दिली.
इरफान अख्तर शेख (२९, रा. जाेगिया, ता. गाडा, जि. सीतामडी, बिहार) आणि मारुफ मतिउर अली (२५, रा. बिहार) अशी या प्रकरणी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. लाेणावळ्यात १ नाेव्हेंबर राेजी दाेघांनी कटी पतंग बंगल्याच्या मुख्य दरवाजाची काच फोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर राेख रकमेसह महागडा माँट ब्लॅक कंपनीचा पेन असा एकूण सहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी अाराेपींविराेधात लाेणावळा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये अाराेपींचा चेहरा व मर्सिडीझ कार निदर्शनास अाली. त्याअाधारे पाेलिसांनी सापळा रचून मर्सिडीझ कार मध्ये बसून संबंधित दाेन अारोपी लाेणावळ्यातील टायगर पाॅइंट येथे अाले असता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात अाली. त्या वेळी त्यांच्याकडे स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, कटर तसेच राेख नऊ हजार रुपये सापडले.
अाराेपीची गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत
वरिष्ठ पाेलिस निरीक्षक दयानंद गावंडे म्हणाले, अाराेपी इरफान शेख याच्यावर नवी दिल्लीत यापूर्वी घरफाेडीचे सात गुन्हे दाखल अाहेत. सुरुवातीला अाराेपी दिल्ली अाणि अाजूबाजूच्या परिसरात घरफाेडी-चाेऱ्या करत हाेते. दिल्लीत २५ लाख रुपयांची शेवटची घरफाेडी करून अाराेपींनी सेकंड हँड मर्सिडीझ कार विकत घेतली. त्यानंतर बिहारहून ते मुंबईत येऊन उच्चभ्रू हाॅटेलचे १५ दिवसांचे बुकिंग करायचे. यादरम्यान, मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात दिवसभर टेहळणी करून बंद असलेले बंगले, फ्लॅटची पाहणी करून रात्री घरफाेडी करून पसार व्हायचे. अाराेपी इम्रान शेख हा चाेरीचे पैसे माैजमजा केल्यानंतर काही रक्कम गावातील गरीब मुला-मुलींच्या लग्नासाठी द्यायचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.