आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या 'मर्सिडीज'चा दिसणार कार रॅलीत दिमाख; देशभरातील ४७ कार्सचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विंटेज कार्स, क्लासिक कार्स म्हटले की नजरेसमोर येतात लांबलचक मर्सिडीज कार आणि मोठ्या गाड्या.. या गाड्यांची शानशौकत काही अाैरच असते. या वाहनांच्या रॅलीचे अायाेजन मर्सिडीज अाणि अाॅटाेकार्सतर्फे मुंबईमध्ये करण्यात अाले असून 'क्लासिक कार रॅली २०१८ लिमिटेड'साठी देशभरातून ४७ कार्सना अायाेजक कंपनींतर्फे निमंत्रण पाठविण्यात अाले अाहे. यामध्ये नाशिकच्या विनयकुमार रवींद्र चुंबळे यांच्या कारलाही निमंत्रण अाले अाहे. चुंबळे यांची १९७६ सालची मर्सिडीज कार यासाठी सज्ज हाेत अाहे. नाशिक शहराचे वैशिष्ट्ये दाखविणाऱ्या चित्रांचे रेखाटन या कारवर करण्यात अाले अाहे.

 

देशभरातील नामवंत विंटेज व क्लासिक कारमध्ये नाशिकच्या कारने सहभाग असणे ही कौतुकास्पद बाब मानली जात अाहे. या कार रॅलीमध्ये दिमाखात सहभागी हाेणाऱ्या या कारबराेबरच नाशिकच्या वैशिष्ट्यांची ओळख व्हावी यादृष्टीने या कारचे साैदर्य खुलविण्यात येत अाहे. या मर्सिडीज बेन्ज डब्ल्यू ११५ कारवर नाशिक शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी चित्रीत करण्यात येत अाहेत. यात त्र्यंबकेश्वर, पांडवलेणी, नाशिकची द्राक्ष, पंचवटी, चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, हनुमान, नाशिकचे विकसित हाेत असलेले उद्याेग क्षेत्र याबाबतची चित्रे रेखाटली जात अाहे. हाताने रंगवून ही कार रॅलीसाठी पाठविली जाणार आहे. विनयकुमार चुंबळे यांनी आपली कार वेगळी कशी दिसेल यासाठी कारवर चित्र काढून तिला नवे रुप देण्याचे ठरविले अाहे. त्यानुसार या कारवर दादासाहेब फाळके यांच्या कॅमेऱ्यातून निघणारी चित्रफीत व त्या चित्रफीतीमध्ये नाशिकचे वैभव साकारले आहे. चित्रकाराच्या कुंचल्याने या ऐतिहासिक कारची शोभा आणखी वाढत असल्याची भावना चुंबळे व्यक्त करतात. त्यांच्या सूचनेनुसार चित्रकार हर्ष बेलदार या कारवर रेखाटन करत अाहेत. या कारला ४२ वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही ही कार व्यवस्थित चालते. या कारचे, तिच्या वयाचे आणि पर्यायाने नाशिकचे महत्त्व दर्शविण्यासाठी ही कार मुंबईमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय रॅलीमध्ये सहभागी होणार आहे.

 

अशी होणार रॅली, २५ किलाेमीटरचे अंतर 

रविवारी (दि. ९) सकाळी १०.३० वाजता सोफिटेल हॉटेल, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथून रॅली सुरू होईल. २५ किलोमीटरचा रस्ता पार करून या रॅलीतील कार पुन्हा परततील.

 

कारबराेबर नाशिकचेही दर्शन घडविणार 

नाशिकची ओळख म्हणून भारतभरातून ही कार निवडली गेली आहे. या कारवर माझ्या घरातील व्यक्तीप्रमाणे माझा जीव आहे. या रॅलीत केवळ ही कार नाही तर या कारबराेबर नाशिक शहराची अाेळख घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न अाहे. हाच हेतू साध्य करण्यासाठी या कारवर चित्रे रेखाटले गेली अाहेत. - विनयकुमार चुंबळे

 

रेखाटनाला लागले ८४ तास 

मर्सिडीज कार ही कारची राणी म्हटली जाते. त्यामुळे या कारवर चित्र रंगविण्याबाबत खूपच उत्सुकता हाेती. कारवर चित्रांचे रेखाटन करण्यासाठी ८४ तास लागले. काही गोष्टी कलाकारांच्या अतिशय जवळच्या असतात, त्याचप्रमाणे ही कार माझ्या जवळची आहे. - हर्ष बेलदार, चित्रकार 

बातम्या आणखी आहेत...