आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळाच्या वृश्चिक राशीमध्ये बुधने केला प्रवेश, सर्व 12 राशींवर पडेल थेट प्रभाव

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

बुधवार 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता बुध ग्रहणे तूळ राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीमध्ये बुध अस्वस्थ राहतो. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीवर कसा राहील बुध ग्रहाचा प्रभाव...

 • मेष - बुध शत्रू आणि आठवा असणे तुमच्यासाठी काहीसे अडचणीचे ठरू शकते. प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. सावध राहावे, वयाने लहान व्यक्ती तुमचा अपमानही करू शकतो.
 • वृषभ - सातव्या बुधाचा तुमच्या राशीवर विशेष प्रभाव राहणार नाही. राशीस्वामीच्या प्रभावामुळे बुध ग्रहाचा प्रभाव कमी राहील. जेवढी मेहनत कराल तेवढेच फळ प्राप्त होईल. कामामध्ये यश मिळेल.
 • मिथुन - सहावा बुध तुमच्यासाठी हितकारक ठरेल. सर्वप्रकारे अनुकूल वातावरण निर्माण करेल आणि शत्रू पराभूत होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
 • कर्क - बुध पाचवा राहील. महत्त्वाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील आणि प्रभाव वाढेल. सरकारी कामामध्ये यश मिळेल. धनलाभ होईल.
 • सिंह - चौथा बुध अनावश्यक चिंतांमध्ये वाढ करेल. नुकसान होण्याची शक्यता वाटत असलेल्या ठिकाणी लाभ होईल आणि लाभाच्या ठिकाणी नुकसान होण्याचे योग जुळून येत आहे. वादाची परिस्थिती हाताळण्यात यशस्वी व्हाल.
 • कन्या - तिसरा बुध तुम्हाला एखादे अशक्य असे वाटणारे यश प्राप्त करून देईल. नवीन योग जुळून येतील आणि सर्व अडचणींवर मात कराल. संपत्तीमध्ये लाभ होऊ शकतो.
 • तूळ - या काळात बुध दुसरा राहील. हा योग सर्वप्रकारे उत्तम राहील. कोणत्याही प्रकारची समस्या उत्पन्न होऊ देणारा नाही. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
 • वृश्चिक - या राशीमध्येच राहील आणि हा काळ सर्वबाजूने प्रगतीचा तसेच धनलाभ करून देणारा राहील. प्रमोशनसोबतच नवीन कामाची जबाबदारी मिळेल. वर्चस्व वाढेल.
 • धनु - बारावा बुध काहीशा अडचणी निर्माण करू शकतो. आर्थिक प्रकरणात अडथळे निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीपासून दूर राहा आणि जोखिमेचे निर्णय घेऊ नये. कुटुंबाकडे विशेष लक्ष द्यावे.
 • मकर- अकराव्या बुधाचे फळ विशेष राहील. कामामध्ये वृद्धी होईल. मनासारखे काम करण्याची संधी मिळेल. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल.
 • कुंभ - दहावा बुध आत्मविश्वासामध्ये वृद्धी करेल आणि अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होईल. धनाची चिंता मिटेल. नवीन कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी चालून येतील.
 • मीन - नवव्या बुधामुळे कामे सहजपणे पूर्ण होतील. कुटुंबात एखादे मंगलकार्य होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील.
बातम्या आणखी आहेत...