Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मेष आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 3 Sep 2018

मेष राशिफळ, 3 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Today Aries Horoscope (11 ऑगस्ट 2018, मेष राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

  • मेष आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya | Today Aries Horoscope in Marathi - 3 Sep 2018
    3 Sep 2018, मेष राशिफळ (Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीच्या लोकांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे, तुमचे धाडस, यामुळे आज काही गोष्टींमध्ये दिवस चांगला राहील पण काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला सांभाळूनही राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

    पॉझिटिव्ह - आज तुम्ही काहीतरी नवीन आणि सकारात्मक विचार कराल. चंद्राची स्थिती तुमच्यासाठी खास राहील. धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. मनातील गोष्टी इतरांसमोर व्यक्त करू शकाल. एखादी गुंतवणूक करण्याचा निश्चय कराल. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. तुमचे घेतलेले निर्णय योग्य ठरतील.


    निगेटिव्ह - ऑफिस, करिअर आणि बिझनेसच्या चिंतेमध्ये तुमच्या जवळच्याच लोकांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. वेळेचे नियोजन जुळून येणार नाही. यामुळे तुमची काही कामे अपूर्ण राहू शकतात. तुमच्यावर एखादे कर्ज फेडण्याचा दबाव राहील. कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाहीत.


    काय करावे - एखाद्या गरिबाला हिरव्या भाज्या दान कराव्यात.


    लव्ह - जोडीदारासोबतचे संबंध मधुर बनवण्याचा प्रयत्न कराल.


    करिअर - ऑफिसमध्ये काम जास्त राहू शकते. सहकाऱ्यांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


    हेल्थ - जखम होण्याचे योग आहेत. डोकेदुखीही होऊ शकते.

Trending