आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आज 5 Dec 2018 ला मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष राशिफळ (5 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांच्या नवीन ओळखी होतील. आज तुम्ही कौटुंबिक संबंधांना जास्त महत्त्व द्याल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. एखादा मित्र किंवा बिझनेस पार्टनर पैसे कमावण्याची नवीन कल्पना देऊ शकतो. आई-वडिलांपासून दूर राहत असाल तर त्यांना भेटण्यासाठी प्रवास होऊ शकतो. स्वतःला जेवढे उदार ठेवाल अडचणी तेवढ्यात दूर राहतील.


निगेटिव्ह - एखाद्या कामाची जबाबदारी स्वतःहून डोक्यावर घेतल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे तुमचा तणाव वाढू शकतो. चंद्र गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानात राहील. यामुळे तुमची रुटीन लाईफ डिस्टरब होऊ शकते. कामाचा ताण वाढू शकतो. सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रवासावर खर्च होऊ शकतो. तुमच्यावर खोटे आरोप लागू शकतात. भावंडांची मदत न मिळाल्यामुळे अडचणी जास्तच वाढू शकतात.


काय करावे - पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा.


लव्ह - पार्टनरच्या संशयाला बळी पडू शकता. या राशीच्या लोकांनी चुकूनही खोटे बोलू नये. नुकसान होऊ शकते.


करिअर - तुमचे काही काम अपूर्ण राहू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीने यश प्राप्त होईल. अधिकारी किंवा मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. काम पूर्ण झाल्यामुळे मूड ऑफ राहील.


हेल्थ - जुन्या रोगांमुळे त्रस्त होऊ शकता. आरोग्याच्या बाबतीत सांभाळून राहावे. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

 
बातम्या आणखी आहेत...