आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसी सहाव्यांदा प्लेअर ऑफ द इयरचा मानकरी, राेनाल्डाे तिसऱ्या स्थानावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिलान - येथील एला स्काला आॅपेरा हाऊसमध्ये फिफाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा साेहळा रंगला. साेमवारी मध्यरात्री रंगलेल्या या साेहळ्यात बार्सिलाेनाच्या लियाेनेल मेसीने आपली चमक दाखवली. त्याला यंदाच्या सर्वाेत्कष्ट खेळाडू (बेस्ट प्लेअर आॅफ द इयर) पुरस्काराने गाैरवण्यात आले. यादरम्यान त्याने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शर्यतीत असलेल्या युवेंट्सच्या राेनाल्डाे आणि लिव्हरपूलच्या व्हर्जिन वान डिकलाही मागे टाकले. मेसी हा सहाव्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. यापूर्वी त्याला २००९ पासून २०१२ आणि २०१५ मध्येही या पुरस्काराने गाैरवण्यात आले हाेते.  अर्जेंटिनाच्या ३२ वर्षीय मेसीने बार्सिलाेनाला ला लीगाचा किताब मिळवून दिला. यात मेसीचे माेलाचे याेगदान ठरले.
 

रेपियाे  सर्वाेत्कृष्ट महिला फुटबाॅलपटू, एलिसन सर्वाेत्तम गाेलरक्षक ठरला 
लिव्हरपूलच्या एलिसन बेकरला सर्वाेत्तम गाेलरक्षक पुरस्काराने गाैरवण्यात आले. त्याने यात लिव्हरपूलच्या अँडरसन आणि बार्सिलाेनाच्या स्टेगनला मागे टाकले. टाॅप-३ प्रशिक्षकांमध्ये तिघेही प्रीमियर लीगचे हाेते. लिव्हरपूलचे क्लाेपने सिटीच्या पेप गुआर्डिआेला व टाॅटेनहॅमच्या माॅरिसियाेला मागे टाकले.  अमेरिकेची रेपियाे सर्वाेत्कृष्ट महिला फुटबाॅलपटू ठरली.तिने  अॅलेक्स माॅर्गन आणि इंग्लंडच्या लुसीला मागे टाकले. 
 

राेनाल्डाेची पुरस्कार वितरण साेहळ्याला दांडी; चर्चेला उधाण

राेनाल्डाेची टीम आॅफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली हाेती. यादरम्यान ताे इटलीच्या तुरीन येथे हाेता. तेव्हाही १४० किमीवरील मिलानला ताे गेला नाही. अशात राेनाल्डाेच्या साेहळ्यातील दांडीने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, त्याने काही फाेटाेही साेशल मीडियावर शेअर केले. युवेंट्सचे मॅनेजर माॅरिजियाे सारी यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राेनाल्डाेला दुखापत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...