आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Messy's Record Best For Sixth Time; The Spanish League Players Have Been The Standard For 11 Years

मेसी विक्रमी सहाव्यांदा सर्वाेत्कृष्ट; ११ वर्षापासून स्पॅनिश लीगचे खेळाडूच मानकरी

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

पॅरिस - बार्सिलाेनाचा सुपरस्टार फाॅरवर्ड लियाेनेल मेसी फुटबाॅलच्या विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या बेलेन डी ओर पुरस्काराचा मानकरी ठरला. ताे यंदाच्या सत्रात जगातील सर्वाेत्कृष्ट फुटबाॅलपटू ठरला.  त्याने विक्रमी सहाव्यांदा या पुरस्काराचा बहुमान पटकावला आहे. यंदाच्या पुरस्कारादरम्यान त्याने  युवेंट्सच्या राेनाल्डाे आणि लिव्हरपूलच्या वान डिकला मागे टाकले. 

अशा प्रकारे सहा वेळा सर्वाेत्कृष्ट फुटबाॅलपटू पुरस्कार मिळवणारा मेसी हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने २०१८-१९ या सत्रातील सामन्यामध्ये आपल्या क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी एकूण ५४ गाेल केले आहेत. याशिवाय त्याने आपल्या अव्वल  कामगिरीच्या बळावर बार्सिलाेनाला ला लीगाचा किताब मिळवून दिला. अर्जेंटिनाचा ३२ वर्षीय मेसी हा २०१५ नंतर या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्याने २००९ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार पटकावला हाेता.

मेसीची कामगिरी

  • गोल: 54, ला लीगा टॉप स्कोअरर: 36 गोल
  • चॅम्पियन्स लीग टॉप स्कोअरर: 12
  • बेस्ट फिफा प्लेअर : ला लीगा, सुपर कोपा, गोल्डन बूट, पिचिची ट्राॅफी, ला लीगा बेस्ट प्लेअर यूईएफए फॉरवर्ड ऑफ द इयर.

गत १० वर्षांत पाच वेळा मेसीला पुरस्कार; लीगचे खेळाडू ठरले पात्र

वर्ष    विजेता   क्लब

2019    मेसी    बार्सिलोना


2018    मोड्रिच    रिअल माद्रिद

2017    रोनाल्डो    रिअल माद्रिद

2016    रोनाल्डो    रिअल माद्रिद

2015    मेसी    बार्सिलोना


2014    रोनाल्डो    रिअल माद्रिद

2013    रोनाल्डो    रिअल माद्रिद

2012    मेसी    बार्सिलोना

2011    मेसी    बार्सिलोना

2010    मेसी    बार्सिलोना  

बेलेन डी ओर हा फ्रेंच शब्द; हिंदीत साेनेरी चेंडू

बेलेन डी ओर हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे. याचा हिंदीमधील अर्थ साेनेरी चेंडू असा हाेताे. फ्रान्स फुटबाॅल असाेसिएशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येेताे. याची सुरुवात १९५६ मध्ये  झाली.