आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Metal Detectorist Rewarded With Nearly £2m As He Enearthed Britains Biggest Treasure

शेतातून जात असताना या व्यक्तीच्या हाती लागल्या अशा काही वस्तू, क्षणात झाला कोट्यवधींचा मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कॉटलँडः स्कॉटलँडच्या गॅलोवे येथे डॅरेक मॅक्लेननहाती नावाच्या व्यक्तीला कोट्यवधींचा खजिना गवसला आहे. झाले असे की, डॅरेक मॅक्लेनन हा एका शेतातून जात होता. त्याला मौल्यवान धातू शोधण्याचा शौक होता. त्यासाठी तो कायम आपल्या हातात एक मेटल डिटेक्टर ठेवायचा. शेतातून जात असताना त्याच्या मेटल डिटेक्टरमधून जोरात आवाज येऊ लागला होता. त्याने वेळ न दवडता, खोदकाम सुरु केले आणि आश्चर्य ते काय एकामागून एक अशा काही वस्तू त्याला मिळाल्या, ज्यातून तो क्षणात कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक झाला. 


हाती लागला प्राचीन खजिना...

- खोदकाम करत असताना डॅरेकला प्राचीन आणि मौल्यवान दागिने मिळाले. त्याला खोदकामात एक मोठा बॉक्स मिळाला. बॉक्स उघडताच त्याचे डोळे चमकले. त्यामध्ये सोन्याचे सिक्के आणि दागिने, चांदीचे दागिने, ब्रेसलेट आणि इतर काही मौल्यवान धातूसह 100 प्राचीन वस्तू होत्या.

 

तज्ज्ञांना दिली सूचना...
- डॅरेक हे संपूर्ण साहित्य घेऊन  QLTR अर्थात क्वीन्स अँड लॉर्ड्स ट्रेजर रिमेंब्रेंस नावाच्या संस्थेतील तज्ज्ञांकडे तो पोहोचला. 
- पुरातत्व विभागाच्या लोकांनी खजिनाची तपासणी करुन सर्व मौल्यवान वस्तू या वाइकिंग साम्राज्याच्या काळातील असल्याचे निदान केले. अर्थातच हा खजिना दहाव्या शतकापासून जमीनीच्या आत होता. ज्या ठिकाणी डॅरेकने खोदकाम केले होते, त्याचठिकाणी या साम्राज्याचे एक महालदेखील होते.

 

डॅरेकला मिळाले बक्षिस स्वरुपात 14 कोटी रुपये...
- QTLR या खजिन्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अद्भूत शोध असल्याचे सांगत हा संपूर्ण खजिना नॅशनल म्युझियमकडे सुपूर्त केला. इतकेच नाही तर हा खजिना शोधून काढल्याबद्दल नॅशनल म्युझियमने QTLR ला डॅरेकला 2 मिलियन डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपये बक्षिस स्वरुपात देण्याचा आदेश दिला.
- डॅरेकने शोधलेला हा खजिना आता स्कॉटलँडच्या नॅशनल म्युझियममध्ये पब्लिक डिस्प्लेसाठी ठेवण्यात आला आहे.  

बातम्या आणखी आहेत...