आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा एकदा इंडियन आयडॉलमधून झाली अनू मलिकची हकालपट्टी, महिला आयोगाच्या नोटिसनंतर सोडला शो 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः संगीतकार आणि गायक अनू मलिकची पुन्हा एकदा इंडियन आयडॉल या सांगितिक रिअॅलिटी शोमधून हकालपट्टी झाली आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अनू मलिकला हा शो सोडावा लागला आहे. एका एजन्सीसोबत बोलताना वाहिनीने याची अधिकृत घोषणा केली आहे. आता शोमध्ये अनू मलिकच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे अद्याप ठरलेले नाही. 

या कारणांमुळे सोडावा लागला शो...
गुरुवारी गायिका सोना महापात्राने  महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणींना ओपन लेटर लिहून याप्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने सोनी टीव्हीला नोटिस पाठवून याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनचे अध्यक्ष रोहित गुप्ता यांना ही नोटिस पाठवण्यात आली होती. 

सोनाने मानले आभार... 
अनू मलिकची शोमधून हकालपट्टी झाल्यानंतर सोनाने #MoveoutMalik या कॅम्पेनला पाठिंबा देणा-या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. 2018 मध्ये शोमधून बाहेर पडले होते मलिक...
2018 मध्ये गायिका सोना महापात्रासह नेहा भसीन आणि श्वेता पंडीत यांनी अनू मलिकवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता.  आरोपांनंतर याच शोमधून अनू मलिकला बाहेर पडावे लागले होते. शोच्या 11 व्या पर्वात वाहिनीने अनू मलिकला पुन्हा एकदा परीक्षकाच्या खुर्चीत बरवले होते. याचा विरोध सोना, नेहा आणि श्वेता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता.