आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • #Metoo Bollywood Actor Saif Ali Khan Reveals He Had Faced Harassment 25 Years Ago

#MeToo: 25 वर्षांपूर्वी माझेही शोषण झाले, अभिनेता सैफ अली खानचा खळबळजनक खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलीवूडमध्ये #MeToo कॅम्पेनमध्ये अनेक कलाकार आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा खुलासा करत आहेत. अॅक्टर सैफ अली खानने या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. एवढेच नाही, त्याने 25 वर्षांपूर्वीचा झालेल्या आपल्या शोषणाचा खुलासा केल्याने खळबळ उडाली आहे. तथापि, त्याची ही हरॅसमेंट सेक्शुअली नव्हती.

 

मीसुद्धा करिअरमध्ये हरॅसमेंटचा सामना केलाय...

सैफ म्हणाला, ''माझ्या करिअरमध्ये मीसुद्धा हरॅसमेंटचा सामना केला आहे, परंतु तो सेक्शुअली नव्हता. मला 25 वर्षांपूर्वी हरॅस करण्यात आले होते. याबाबत विचार केल्यावर मला आजही प्रचंड संताप येतो. बहुतांश जण इतरांना समजून घेत नाहीत. दुसऱ्यांचे दु:ख समजणे खूप अवघड आहे. मी याबाबत बोलू इच्छित नाही, कारण आज हे महत्त्वाचे नाही. आज आपण महिलांची काळजी घेण्याची जास्त गरज आहे.''

सैफ म्हणाला की, आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे. ते जरी एखाद्या जुन्या प्रकरणात दोषी आढळले तरीही. सैफच्या म्हणण्यानुसार, ''पीडित हे अपमानित झालेले आहेत आणि न्यायाची प्रतीक्षा आहे. जे घडतंय ते योग्य नाही. ज्यांनी महिलांचे लैंगिक शोषण केले त्यांना भोगावेच लागेल.''

 

साजिदवरील आरोपांवर सैफ म्हणाला...
सैफने साजिद खानवर लागलेल्या गंभीर आरोपांवरही प्रतिक्रिया दिली आहे. तथापि, सैफने साजिदचा चित्रपट हमशकल्समध्ये काम केले होते. मूव्हीची लीड अॅक्ट्रेस बिपाशा बसू आणि ईशा गुप्ताने साजिद खानच्या गैरवर्तणुकीवर जबाब दिला. यावर सैफने सांगितले, ''मला खरंच माहिती नव्हतं की, असं काही घडलं आहे. जर माझ्यासमोर असं काही झालं असतं, तर त्या वातावरणात मी काम करू शकलो नसतो. माझ्यासमोर या गोष्टी घडूच दिल्या नसत्या. जेथे महिलांचा अपमान होतो, असे ठिकाण मी स्वीकारणार नाही.'' 

 

 

बातम्या आणखी आहेत...