आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • #metoo Bollywood Actress Isha Koppikar Open Up About Her Casting Couch Experience Superstar Invited To Meet Home

बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पिकरचे झाले होते कास्टिंग काऊच, सुपरस्टारने बोलावले होते घरी भेटायला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'पिंजर', 'सलाम ए इश्क' आणि 'एक विवाह ऐसा भी 'यासह  अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री ईशा कोप्पिकरने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक गोष्ट उलगडली आहे. ईशा कोप्पीकरला देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. नुकत्याच एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत  तिने हा धक्कादायक अनुभव सांगितला.

निर्मात्याने सुपरस्टारला फोन करायला सांगितला होता..
मुलाखतीत ईशाने सांगितले,  ''एका निर्मात्याने मला सांगितले होते की, एक चित्रपट बनतोय त्यासाठी तू अभिनेत्याला फोन कर. तुला त्याच्या गुड बुक्समध्ये सामील व्हावे लागेल. मी त्या अभिनेत्याचे संपर्ण दिवसाचे शेड्युल जाणून घेतले. तो सकाळी लवकर उठतो. जिमला जाणे पसंत करतो. मी त्याला फोन केला तर त्याने मला बोलावून घेतले.'' 


“ही 2000 मधील गोष्ट आहे. मी त्या अभिनेत्याच्या घरी गेले. मला कामाची गरज होती त्यामुळे मागचा पुढचा विचार न करता मी त्याला भेटायला गेली. त्यावेळी काम मिळवून देण्याच्या बदल्यात त्याने मला त्याच्यासोबत शय्यासोबत करण्यास सांगितले. परंतु त्याला मी साफ नकार दिला. माझ्या नकारामुळे नाराज झालेल्या त्या अभिनेत्याने माझे फिल्मी करिअर सुरु होण्याआधीच संपवण्याची धमकी मला दिली. परंतु त्याच्या मानसिक दबावाला मी बळी पडले नाही.” 


ईशाने पुढे सांगितले की, तिने त्या अभिनेत्यासोबत कधीच काम केले नाही. काही टॉप सेक्रेटरीजनेही तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी सेल्फ डिफेन्स सुरु केल्याचे ईशा म्हणाली. 

यावेळी ईशाने नेपोटिज्मवरही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, अनेकदा भूमिकेसाठी तिची निवड झाली. पण कधी कुणी आपल्या मुलीसाठी तर कधी आपल्या आवडत्या अभिनेत्रीसाठी निर्माते-दिग्दर्शकांनी तिला चित्रपटातून काढून टाकले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेकदा असे अनुभव आल्याचे ईशाने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...