आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: \'जॉली LLB\'च्या दिग्दर्शकाला या अभिनेत्रीने लगावली होती कानशिलात, हे पाहून रडू लागली त्याची पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'जॉली एलएलबी' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक सुभाष कपूर पुन्हा एकदा आपल्या जुन्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आहेत. ते गुलशन कुमारचा बायोपिक 'मुगल' डायरेक्ट करणार होते. या चित्रपटाचे प्रोड्यूसर आणि लीड अॅक्टर आमिर खान होते. परंतु #MeToo कँपेनला सपोर्ट करताना आमिरने या चित्रपटास नकार दिला. कारण गीतिकाने त्याला आणि त्याची पत्नी किरण रावला त्यांच्यासोबत झालेल्या सेक्शुअल हरॅशमेंटची आठवण करुन दिली. 2014 मध्ये अभिनेत्री गीतिका त्यागीने सुभाष कपूरवर सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला होता. याप्रकरणी अजून त्याला क्लीन चिट मिळालेली नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्यानंतर सुभाष कपूरचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये गीतिका रडत आहे आणि सुभाषची पत्नी डिंपल खरबंदासमोर त्यांना कानशिलात लगावताना दिसतेय. 


2012 मध्ये घरी येऊन सुभाष कपूरने गीतिकाचा केला होता छळ 
- 'आत्मा''वन बाई टू' आणि 'व्हाट द फिश' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या गीतिका त्यागीने 2014 मध्ये स्वतः सुभाष कपूरला कानशिलात लगावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सुभाषला पाश्चाताप होतोय, असे दिसत होते. हे प्रकरण मे 2012चे आहे याच्या दिड वर्षानंतर म्हणजेच 2014 मध्ये गीतिकाने सुभाष आणि त्याचा सहकारी दानिश रजा विरुध्द वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवला होता. त्यागीने सांगितले होते की, सुभाष आणि दानिश मे 2012 ला तिच्या घरी गेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यागीने तेव्हा सांगितले होते की, सुभाषने त्यावेळी दारु प्यायली होती. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 354, 501 आणि 34 नुसार तक्रार दाखल केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...