आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Metoo In Taekwondo Coach Manoj Shivhare Alleged By 15 Year Old For Physical Assault

#MeTooतायक्वांदो प्लेअरचा कोचवर आरोप म्हणाली, सरांना म्हणत होते, झोपू द्या उद्या फायनल आहे.. तरी ते रात्रभर छेडत होते..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरैना - पुण्यात 19-20 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल ओपन तायक्वांदो स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या मुरैनाच्या 15 वर्षीय विद्यार्थिनीने कोच मनोज शिवहरेवर छेडछाडीचा आरोप केला आहे. विद्यार्थिनीने म्हटले की, सरांनी हॉटेलमध्ये तीन मुली आणि दोन मुलांना एकाच रूममध्ये थांबवले होते. तसेच ते स्वतःदेखिल त्याच खोलीत थांबले होते. त्यांनी मुलींना त्यांच्याबरोबर पलंगावर झोपण्यास सांगितले आणि रात्री त्यांच्याबरोबर छेडछाड केली. पोलिसांनी मनोजला अटक केली आहे. मात्र त्याने आपण निर्दोष असून त्याला फसवण्यात आल्याचे म्हटले आहे. 


गोल्ड मेडल घ्यायलाही गेली नाही, तेव्हा आईला आला संशय 
तायक्वांदो ट्रेनरच्या कोचिंग सेंटरवर 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी एका सोहळ्यात नॅशनल स्पर्धेत मेडल मिळवणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यासाठी गोल्ड मिळवणाऱ्या या विद्यार्थिनीलाही आमंत्रित केले होते. सायंकाळी जेव्हा आईने मुलीला विचारले आज तुझा सत्कार आहे तू कार्यक्रमात का गेली नाही. त्यावर मुलगी रडू लागली आणि तिने आईला सर्व सांगितले. 

 

मी म्हणत होते, मला झोपू द्या उद्या फायनल आहे.. आणि ते रात्रभर छेडत होते.. 
पीडित मुलीने एफआयआरमध्ये सांगितले की, 17 ऑक्टोबरला पाच खेळाडू मनोज सरांबरोबर पुण्याला गेले होते. सरांनी त्याठिकाणीही सर्वांना एकाच रूममध्ये थांबवले होते. 19 ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी म्हटले की, तिन्ही मुली पलंगावर माझ्याबरोबर झोपा. मुलांना जमिनीवर झोपवले. रात्री ते अचानक माझ्याबरोबर अश्लिल चाळे करू लागले. मी घाबरून जमिनीवर झोपायला गेले. सर त्याठिकाणीही आले. मी त्यांना म्हटले सर, मला झोपू द्या, उद्या माझी फायनल फाइट आहे. पण ते रात्रभर छेड काढत राहिले. मी प्रचंड तणावात होते तरीही मी फायनल जिंकत गोल्ड मेडल मिळवले. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवर एफआयआर दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...