आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo in IPL : मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगावर भारतीय गायिकेने केला विनयभंगाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कामाच्या ठिकाणी महिलांच्या शोषण होण्याच्या प्रकरणांना वाचा  फोडण्यासाठी सुरू झालेल्या #MeToo वादळाचा तडाखा क्रीडा क्षेत्रालाही बसतोय. क्रिकेटमधली प्रचंड लोकप्रिय आयपीएल स्पर्धाही आता या आरोपाच्या कचाट्यात सापडली आहे. भारतातील चिन्मयी श्रीपाद या गायिकेने मुंबई इंडियन्स संघातील लसिथ लिंगावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. तिने एका निनावी मुलीच्या वतीने हे आरोप केल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. तिची पोस्टही चिन्मयीने शेअर केली आहे. 

 

श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यावरही एका एअर होस्टेसने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर अशाप्रकारचे आरोप होणारा हा श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू या वादात अडकला आहे. 

 

काय आहे पोस्टमध्ये.. 
पोस्टमध्ये या मुलीने म्हटले आहे की, मला निनावी राहायला आवडेल. काही वर्षांपूर्वी मी मुंबईत आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये माझ्या मैत्रिणीला शोधत होते. त्याच हॉटेलमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगाही थांबलेला होता. मलिंगा मला म्हणाला की, माझी मैत्रिण त्याच्या खोलीत आहे. मी खोलीत गेले तर त्याने मला बेडवर ढकलले आणि माझ्याशी गैरवर्तन करू लागला. तो काही केल्या ऐकत नव्हता. तेवढ्यात हॉटेलच्या स्टाफने दरवाजा ठोठावला. ते आत आले तेवढ्या वेळात मी चेहरा स्वच्छ केला आणि तिथून बाहेर निघाले. मला माहिती आहे की, लोक मला म्हणतील तू मुद्दाम त्याच्या खोलीत गेली होतीस. 

Cricketer Lasith Malinga. pic.twitter.com/Y1lhbF5VSK

— Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 11, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...