Home | International | Other Country | mexican police found 166 heads in mass grave

Mass Murder: गुप्तहेराने दिली होती सामूहिक कब्रस्तानाची माहिती, आत सापडले 150 माणसांचे धड नसलेले शिर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:09 AM IST

मेक्सिकोत पोलिसांना एकाच ठिकाणी 166 जणांचे धड नसलेले शिर सापडले आहेत.

 • mexican police found 166 heads in mass grave

  इंटरनॅशनल डेस्क - मेक्सिकोत पोलिसांना एकाच ठिकाणी 166 जणांचे धड नसलेले शिर सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हेराक्रूझ राज्यात सामूहिक हत्याकांड झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांना घटनास्थळाचा तपास केला असता त्यांना सामूहिक कबर सापडली. खोदून पाहिले असता त्याने एकानंतर एक 166 जणांचे शिर सापडले आहेत. इतक्या मोठ्य़ा प्रमाणात लोकांना कुणी आणि का ठार मारून असे पुरले याचा अद्याप काहीच पत्ता नाही.


  200 कपडे, 144 आयडी कार्ड सुद्धा सापडले...
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणांमुळे घटनास्थळाची सविस्तर माहिती देता येणार नाही. तेथून 200 जणांचे कपडे आणि 144 आयडी कार्ड सुद्धा सापडले आहेत. त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले असून सविस्तर तपास सुरू आहे. पोलिसांना या ठिकाणाची माहिती ऑगस्टमध्ये मिळाली. त्याचवेळी खोदकाम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत या ठिकाणावरून 166 शिर बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच त्या सर्वांना 2 वर्षांपूर्वी ठार मारण्यात आले असा तज्ञांचा प्राथमिक अंगाज आहे.

  गतवर्षीही सापडले होते मानवी अवशेष

  मेक्सिको पोलिसांना गेल्या वर्षी सुद्धा अशाच कब्रीचा पत्ता लागला होता. तेथून 117 मानवी अवशेष बाहेर काढण्यात आले होते. त्यामध्ये लहान मुलांचेही अवशेष होते. फॉरेन्सिक टीमला खोदकाम करण्यासाठी 12 दिवस लागले होते. मेक्सिको अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी टोळ्यांसाठी जगभरात कुप्रसिद्ध आहे. येथे गँगवॉरमध्ये आणि त्यानंतर सूड घेण्यासाठी सामूहिक हत्याकांड घडले आहेत. त्यापैकी अनेकांना पॉलिथीनमध्ये गुंडाळून किंवा मृतदेह विक्षिप्त करून फेकण्याच्या घटना देखील घडल्या.

Trending