आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोमध्ये तुफान गारपीट : दीड तासात पाच फूट बर्फ साचला, हटवण्यासाठी लष्करास पाचारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी - हे छायाचित्र मेक्सिकोतील ग्वादलजारा शहरातील आहे. येथे रविवारी सकाळी वादळी गारपीट झाली. यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यावर पाच फूट जाडीचा बर्फ पडला होता. त्यामुळे शहरभर बर्फाचे छोटे डोंगरच तयार झाले होते. गारपिटीमुळे रस्ते तसेच घराबाहेर उभी असलेली वाहने दबली गेली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, रस्त्यावर साचलेला बर्फ काढण्यासाठी लष्करास पाचारण करावे लागले. जलिस्कोचे गव्हर्नर अल्फारो रामिरेज यांनी सांगितले, सुमारे दीड तास वादळ आले. त्यात गाराही कोसळल्या. यात २०० घरे व ५० वाहनांचे नुकसान झाले आहे. 


बर्फाळ नद्यांसारखे दिसत हाेते शहरातील रस्ते
स्थानिक लोकांनी सांगितले, सुमारे दीड तास गारपीट झाली. वादळ शमल्यानंतर घराबाहेर पडलो तेव्हा रस्ते बर्फाळ नद्यांप्रमाणे दिसत होते. वाहने बर्फाखाली दबली होती. ती काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. त्यानंतर आपत्कालीन सेवांची मदत घ्यावी लागली.

बातम्या आणखी आहेत...