आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तिने दाेन वर्षांत 291 किलो वजन घटवूनही गमावला विक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको- जुआन पेड्रो फ्रँको (३४) याने जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती असल्याचा विक्रम गमावला आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमधून नाव वगळले गेल्यानंतर जुआनला त्याचे वाईट वाटलेले नाही. उलट आनंद वाटला. ५९५ किलो वजन असलेल्या जुआनने बेरियाट्रिक सर्जरी करून गेल्या दोन वर्षात २९१ किलो वजन घटवले. आता त्याचे वजन ३०४ किलो आहे. जुआन आता अंथरुणावरून उठून चालू फिरू शकतो. आता त्याला आपले वजन १३८ किलो करायचे आहे. जुआनने सांगितले, एका आजारात ६ वर्षात त्याचे वजन  दरवर्षी ९ किलोने वाढत होतेे.

 
सुरुवातीला ६ पावले चालले की, तो दमून बसत असे. परंतु आता १०० पावलापेक्षा जास्त चालतो. १७ व्या वर्षी अपघात झाला होता. यामुळे तो ६ वर्षे अंथरुणाला खिळून होता. मेक्सिकोच्या ग्वाडलहराच्या रुग्णालयात जुआनवर सर्जरी करण्यात आली. जुआनला स्पेशल हायटेक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला काही महिने दवाखान्यात राहावे लागणार आहे. आता त्याच्या स्नायूवर लक्ष देण्यात येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...