मेबॅक कंपनी बाजारात / मेबॅक कंपनी बाजारात आणणार हिरेजडीत कार

May 22,2011 01:34:05 PM IST

नवी दिल्ली - लग्झरी कार बनविणारी जर्मन टेक्नॉलाजीच्या मेबॅक कंपनीने चक्क हिरे जडीत कारची निर्मीती केली आहे.

त्यासाठी मेबॅक कंपनीने स्विस ज्वेलरी अणि घड्याळ बनविणाऱ्या डी ग्रिसोगोनो या कंपनीसोबत व्यावसायीक करार केला आहे. कान चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजीत एका विशेष कार्यक्रमात या हिरे जडीत कारचे लॉंचींग करण्यात आले. मेबॅक ६२५ असे या कारला नाव देण्यात आले आहे. कारच्या मागच्या सिटजवळ आर्मरेस्टवर बहुमूल्य जेम्स लावण्यात आले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार या कारची निर्मीती होणार आहे. त्यामुळे आसनव्यवस्था, आतील सजावट आणि गाडीचे डिझाईनबाबत ग्राहकांच्या पसंतीनुसार बदल करता येणार आहे. सीट, स्टिअरींग व्हील, लिव्हरवर देखिल हिरे व जेम्स बसविले जाणार आहेत. उभय कंपनी आणखी काही कार मध्ये हिऱ्यांचा वापर करण्याबाबत विचार करत आहे. या हिरेजडीत कारला दुबईतील आंतरराष्ट्रीय कारच्या शोरूममध्ये ठेवण्यात येणार आहे.

X