आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MG ने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक ZS EV लॉन्च केली, कंपनीचा दावा- 1 किमीसाठी फक्त 1 रुपये खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ZS EV ला एक्साइट आणि एक्सक्लूसिवच्या दोन व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले आहे
  • ज्या ग्राहकांनी याची प्री-बुकिंग केली होती, त्यांना एक लाख रुपयांचा फायदा दिला जाईल

गॅजेट डेस्क- एमजी मोटर्सने भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक कार MG ZS EV लॉन्च केली आहे. याला एक्साइट आणि एक्सक्लूसिव व्हॅरिएंटणध्ये लॉन्च करण्यात आलंय. या इलेक्ट्रिक एसयूवीची सुरुवात 20.88 लाख रुपयांपासून होते. ज्या ग्राहकांनी याची प्री-बुकिंग केली होती, त्यांना एक लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे. याची प्री-बुकिंग 17 जानेवारीच्या रात्री बंद झाली होती. कंपनी या किमतीत होम माउंटेड एसी चार्जर आणि पॉवर केबल देणार आहे.

MG ZS EV ची किंमत


एक्साइट व्हॅरिएंट 20,88,000 रुपये आणि एक्सक्लूसिव 23,58,000 रुपये आहे. एक्साइट आणि एक्सक्लूसिव व्हॅरिएंटच्या किमतीत 2,70,000 रुपयांचे अंतर आहे. एक्सक्लूसिव व्हॅरिएंटणध्ये रूफ रेल्स, लेदर सीट्स, डुअल-पेन सनरूफ, PM2.5 एअर फिल्टर, सिक्स-वे अॅडजेस्टेबल ड्राइवर सीट, रेन-सेंसिंग फ्रंट वायपर्स आणि आयस्मार्ट EV 2.0 कनेक्टेड फीचर्स आहेत.

MG ZS EV चे इंजिन

या इलेक्ट्रिक कारमध्ये 44.5kWh लिक्विड-कूल्ड बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर्स आहे. जी 143hp पॉवर आणि 353Nm टॉर्क जनरेट करते. मोटरने जी पॉवर जनरेट होते, ती फ्रंट व्हीलवर जाते. ही कार सिंगल स्पीड ऑटोमैटिक गियरबॉक्ससोबत येते. एमजीच्या 50kW डीसी फास्ट चार्जरने फक्त 50 मिनीटात 80 टक्के चार्जिंग होऊ शकते. तर, नॉर्मल 7.4kW एसी चार्जरच्या मदतीने 6 ते 8 तासात ही कार फूल चार्ज होते. कंपनी यासोब पोर्टेबल चार्जिंग केबल देईल, ते 15A इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये वापरता येऊ शकते. ओटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI)च्या सर्टिफिकेटनुसार फुल चार्ज झाल्यानंतर याची रेंज 340 किलोमीटरपर्यंतची आहे.

MG ZS EV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन


> MG ZS EV मध्ये LED DRL असलेले ऑटोमॅटिक प्रोजेक्टर हेडलाइट्स दिले आहेत.


> यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमदेखील आहे.


> सेफ्टीसाठी यात 17-इंच अलॉय व्हील आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहेत.


> याच्या टॉप मॉडलमध्ये पॅनारोमिक सनरूफ, लेदरेट सीट्स, पॉवर-एडजेस्टेबल ड्राइवर सीट आहे.


> कारच्या कॅबिनमध्ये हवेला साफ करण्यासाठी PM 2.5फिल्टर आणि रेन-सेंसनिंग वायपर्स आहेत.


> ZS EV च्या सर्व व्हॅरिएंटमध्ये एबीएस, ईबीडी, ईएससी, सिक्स एयरबैग्स, हिस-स्टार्ट असिस्ट, हिल-डीसेंट कंट्रोल, रियर पार्किंग कॅमेरा आणि रिअर सेंसरसारखे सेफ्टी फीचर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...