आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे ढकलण्याचे प्रयत्न; सरकारच्या डोक्यावर 4.17 लाख कोटींचे कर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्प पुढे ढकलण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती नवनिर्वाचित राज्य सरकारचे मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी दिली. राज्य सरकारच्या डोक्यावर तब्बल 4 लाख 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळेच, बुलेट ट्रेन आणि इतर प्रकल्प लांबणीवर टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत असे पाटील म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील बुलेट ट्रेन आणि इतर विकासकामे लांबणीवर टाकण्याचा विचार केला जात असल्याचे असल्याचे म्हटले आहे.

एका माध्यमाशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, "सरकारवर 4.71 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे सरकारवर अतिरिक्त 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज होत आहे. त्यामुळेच, सध्या सुरू असलेली विकासकामे राज्याच्या विकासासाठी किती महत्वाची आहेत याचा विचार केला जात आहे. त्यामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश आहे. सरकारकडे सध्या अशा प्रकारचे किती प्रकल्प आहेत आणि सरकार असलेल्या कर्जापैकी कितीची परतफेड करू शकते यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे." मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हापासूनच सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू झाली. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे शेतकरी आणि आदिवासींची जमीन अधिगृहित केली जात आहे. त्यावरून हे स्थानिक खुश नाहीत असेही सांगण्यात आले.

शेतकरी कर्जमाफीची तयारी

भाजप सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. परंतु, त्या कर्जमाफीने शेतकरी खुश नाहीत. ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असे जयंत पाटील म्हणाले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकाआघाडी सरकारने किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हे या सरकारचे आश्वासन आहे.
 

बातम्या आणखी आहेत...