आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निपथ... अग्निपथ... अग्निपथ... संजय राउत यांचे रुग्णालयातून डिस्चार्जपूर्वी ट्विट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एन्जिओप्लास्टी आणि दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संजय राउत यांना डिस्चार्ज
  • राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी करत असताना संजय राउत यांचे ट्विट चर्चेत

मुंबई - शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राउत यांनी डॉक्टरांनी बुधवारी डिस्चार्ज दिला. तत्पूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह बुधवारी सकाळी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील संजय राउत यांची भेट घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता. या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी संजय राउत यांनी हरिवंशराय बच्चन यांची कविता अग्निपथची एक ओळ ट्विट केली आहे. काँग्रेस नेत्यांसोबत झालेली भेट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची होऊ घातलेली आघाडी याचा संबंध या कवितेशी देखील जोडून पाहिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...