आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MHADA Lottery: म्हाडाच्या 217 घरांसाठी सोडत जाहीर, येथे जाणून घ्या आपले नाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - म्हाडाच्या मुंबईतील बहुप्रतीक्षित 217 घरांसाठी सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये सर्वात भाग्यवान प्रथम विजेत्या म्हणून राशी कांबळे यांचे नाव समोर आले आहे. गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी सोडत काढण्यात आली आहे. म्हाडाच्या या घरांसाठी एकूणच 66,011 जणांनी अर्ज दाखल केले होते. म्हाडाच्या संकेतस्थळावरून या लॉटरीच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.


एकूणच 217 घरांच्या या लॉटरीत अल्प उत्पन्न गटासाठी सहकारनगर आणि चेंबूर येथील 170 तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी 47 घरांचा समावेश करण्यात आला आहे. अल्प उत्पन्न गटासाठी 53 हजार 455 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 12 हजार 636 अर्ज दाखल झाले होते. या दोन्ही गटांमध्ये जवळपास 106 कोटी आणि 37 कोटी इतकी अनामत रक्कम जमा करण्यात आली आहे.


येथे क्लिक करून पाहा म्हाडाच्या घरांची लॉटरी
https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Mumbai/