आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेत्याने लॉटरीमध्ये जिंकला होता 5.9 कोटी रुपयांचा सर्वात महागडा फ्लॅट; बालमित्राने फ्लॅट पाहताचा सांगितले - वेळ जायच्या आत याला परत कर, हे सांगितले यामागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - येथे शिवसेना नेते विनोद शिर्के यांनी गेल्यावर्षी महाराष्ट्र हाउसिंग अॅण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (म्हाडा)च्या लॉटरीत मिळालेला 5.8 कोटी रुपये किंमतीचा फ्लॅट परत केला आहे. चुकीची वास्तू असल्याचे कारण देत शिर्केंनी हा फ्लॅट परत केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, फ्लॅटमधील शौचालय ईशान्य दिशेला आहे. मी माझ्या वास्तु सल्लागारच्या सांगण्यावरून हा फ्लॅट परत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. हा फ्लॅट म्हाडाच्या लॉटरीच्या इतिहासातील विकल्या गेलेला सर्वात महागडा फ्लॅट आहे.   

 

 

एकाच बिल्डिंगमध्ये जिंकले दोन फ्लॅट

शिर्के शिवसेनेच्या आग्रिपाडा शाखेचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनी गेल्या डिसेंबरच्या लॉटरीत नाना चौक येथील धवलगिरी बिल्डिंगमध्ये दोन '2 बीएचके' फ्लॅट जिंकले होते. यातील एकाची किंमत 4.99 कोटी तर दुसरा 5.8 कोटी रुपये किमतीचा होता. शिर्केंनी सांगितले की, त्यांनी आपला बालमित्र आणि ज्योतिष तज्ञ तेजस ताळसकर यांनी दोन्ही फ्लॅट दाखवले होते. यानंतर तेजसने दोन्ही फ्लॅटमध्ये वास्तूदोष सांगत तो परत करण्याचा सल्ला दिल्ला. पण असे असले तरी शिर्के सध्या एक फ्लॅट स्वतःकडे ठेवत आहेत. 

 

आता पुढे काय ?

म्हाडाच्या अधिकाऱ्यांना माहितीचे पुष्टीकरण सांगितले की, विनोद शिर्केकडून फ्लॅट सोडण्याची सूचना विभागाला प्राप्त झाली आहे. आता प्रक्रियेनुसार फ्लॅटला वेट लिस्टेट लोकांसमोर ठेवण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...