आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमएचटी- सीईटी : विनायक गाेडबाेले, अभंग राज्यात प्रथम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला. यात विनायक मुकुंद गाेडबाेले (पीसीबी) हा खुल्या गटातून, तर नांदेड जिल्ह्यातील आदर्श मुकुंद अभंग (पीसीएम) हा राखीव गटातून १०० पर्सेंटाइल घेत राज्यात सर्वप्रथम आला. तर ‘पीसीएम’मध्ये खुल्या गटातून अमन जितेंद्र पाटील व मुग्धा महेश पाेखरणकर यांनी ९९.९९ पर्सेंटाइल मिळवले. गीतांजली शहाजी वारंगुळे ही मुलगी ९९.९९ पर्सेंटाइल मिळवत राखीव गटातून मुलीत प्रथम आली. तर ‘पीसीबी’तून रुचा आेमप्रकाश पालक्रीतवार (९९.९९) खुल्या गटातून मुलीत सर्वप्रथम आली. राखीव गटातून अभिषेक घाेलप व गीतांजली वारंगुळे यांनीही ९९.९९ पर्सेंटाइल मिळवले. यंदा प्रथम ‘जेईई’प्रमाणे विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल जाहीर करण्यात आले.


४.१३ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
राज्यातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.