आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात री लॉन्च झाली एमआयची पर्सनल लोन सर्व्हिस, 5 मिनीटात मिळेल 1 लाखापर्यंतचे कर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा आधीपेक्षा जास्त सुरक्षित आहे, याचा इनक्रिप्टेड डेटा भारतातील Mi सर्वरमध्ये स्टोर होईल

गॅजेट डेस्क- चीनी टेक कंपनी श्याओमीने आपली पर्सनल लोन सर्व्हिस एमआय क्रेडिटला भारतीय बाजारात परत एकदा लॉन्च केले आहे. याच्या माध्यमातून युजर्सना फक्त 5 मिनीटांमध्ये एक लाखापर्यंतचे कर्ज मिळेल. 'एमआय पे'नंतर आता ही कंपनीची दुसरी फायनांशियल सॉल्यूशन सर्व्हिस आहे. श्याओमीचे म्हणने आहे की, 100% डिजीटल अप्रोचने एमआय क्रेडिट सर्व्हिस एमआय फॅन्सला जलद आणि सुविधाजनक पद्धतीने कर्ज देईल. याची विशेषता ही आहे की, यूजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एमआ क्रेडिटचा पूर्ण डेटा भारतातच इनक्रिप्टेड फॉर्ममध्ये स्टोर केला जाईल. याला सर्वात आधी मार्च 2018 मध्ये लॉन्च केले होते.

डाक्यूमेंट आणि सेल्फी अपलोड करावी लागेल


> कंपनीने एमआय क्रेडिटने लँडिंग पार्टनर म्हणून आदित्य बिरला फायनांस लिमिटेड, मनी व्यू, अर्लीसैलरी, ज़ेस्टमनी आणि क्रेडिटविधासहित इतर फिनटेक ब्रँड आणि नॉन-बँकिंग फायनांशियल कंपनी (एनबीएफसी)सोबत पार्टनरशिप केली आहे.

> यात लोनसाठी अप्लाय करणे खूप सोपे आहे. कंपनीने सांगितले की, यात रिअल टाइम अप्रूवलची सुविधा मिळेल. यूजर्सला महत्वपूर्ण डॉक्यूमेंट आणि सेल्फी अपलोड करण्यासोबतच कर्ज घेण्याचे कारण सांगावे लागेल.


> कंपनीने सांगितल्यानुसार याची विशेषता आहे, याची पेपरलेस केवाईसी फीचर. याच्या मदतीने देशातील कोणत्याही मोठ्या बँक अकाउंटमध्ये लोन तात्काळ क्रेडीट केले जाईल.


> सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अमेझॉन वेब सर्व्हिस क्लाउंड इंफ्रास्ट्रक्चरच्या मदतीने एमआय क्रेडिटचा पूर्ण डेटा भारतात असलेल्या एमआय सर्वरमध्येच स्टोर असेल.


> श्याओमीने सांगितले की, एमआय क्रेडिट सर्विस बाजारात उपलब्ध इतर कंपन्यांच्या तुलनेत सर्वात कमी व्याज दराने कर्ज देते. शिवाय यात फ्री क्रेडिट रिपोर्ट जनरेशन सर्व्हिसची सुविधा मिळेल. यासाठी श्याओमीने एक्सपीरियन्स क्रेडिट रिपोर्टिंग सॉल्यूशनसोबत पार्टनरशिप केली आहे.हा अॅ श्याओमीच्या सर्व फोनमध्ये प्री-लोडेड असेल, किंवा याला प्ले स्टोरवरुनदेखील खरेदी केले जाऊ शकते. कंपनीने सांगितले की, या सर्व्हिसमधून आतापर्यंत 28 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. सध्या एमआय क्रेडिट सर्व्हिस देशातील 10 राज्यात उपलब्ध आहे, तर 1500 पेक्षा जास्त पिनकोडमध्ये याची सुविधा दिली जात आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण देशात याची सुविधा उपलब्ध असेल.

बातम्या आणखी आहेत...