Home | National | Other State | 'MI-Two' charged on the IPS of IPS: Superintendent's husband's suicide after the incident

महिला अधीक्षकाचा आयपीएसवर ‘मी टू’चा आरोप:घटनेनंतर अधीक्षकाच्या पतीची आत्महत्या

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 10:02 AM IST

सहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्याय मिळाला नसल्याची पोलिस अधीक्षक लीना डोले यांनी केली तक्रार

  • 'MI-Two' charged on the IPS of IPS: Superintendent's husband's suicide after the incident

    गुवाहाटी - बॉलीवूड व राजकारणानंतर आता पोलिस विभागापर्यंत ‘मी टू’ मोहीम पोहोचली आहे. आसाममधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर कनिष्ठ महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. माजुली मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक लीना डोले यांनी राज्याचे एडीजी (कायदा-सुव्यवस्था) मुकेश अग्रवाल यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला. अग्रवाल यांनी सहा वर्षांपूर्वी चुकीचे वर्तन केले होते. त्यानंतर पतीने आत्महत्या केली. मला न्याय मिळाला नाही. सोशल मीडियातील मी टू मोहिमेअंतर्गत पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपाचे हे नवीन प्रकरण आहे.


    लीना डोले यांनी फेसबुकवर रविवारी यासंबंधी पोस्ट टाकली आहे. कार्यस्थळी लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा दावा त्यांनी यातून केला. मार्च २०१२ मध्ये माझे वरिष्ठ अधिकारी मुकेश अग्रवाल यांनी माझ्या चांगल्या कामाबद्दल खुश होऊन सोबत सुटी साजरी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अग्रवाल यांच्याकडे तेव्हा लॉजिस्टिक विभागाची जबाबदारी होती, परंतु मी त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्याचबरोबर त्याची माहिती डीजीपींना दिली होती. त्याबद्दल लेखी तक्रारही केली होती, असे लीना यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले.


    डोले यांनी तक्रार दाखल केल्याच्या सहा महिन्यांनंतर पतीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्य सचिव एमिली चौधरी माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु तक्रारीनंतरही चौकशी सुरू झाली नाही. उलट माझी तक्रार फेटाळण्यात आली. वास्तविक आरोपीने तथ्य स्वीकारले होते, असे डोले म्हणाल्या. माझ्या पतीला माहिती देण्यात आली नव्हती. परवानगीशिवाय सुटीवर नेण्याचा तो प्रस्ताव होता. मात्र त्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला हाेता.

    पुढे गुवाहाटी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. त्यात माझ्या बाजूने निर्णय आला. मला दोन मुले आहेत. मला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही, असे डोले यांनी सांगितले.या वादामुळे आसाममधील प्रशासकीय क्षेत्रातील वर्तणूक समोर आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बॉलीवूडमधील काही कलाकारांनी मोठ्या कलाकारांवर आरोप केला आहे. त्यामुळे अनेक दिग्दर्शक अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर काही कलाकारांनी आरोपांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. हॉलीवूडमध्ये त्या अगोदर मी-टू मुळेे अनेक बड्यांची पोलखोल झाली होती. त्यात खटलेही सुरू आहेत.

Trending