आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई इंडियन्स विजयी ट्रॅकवर; राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलग दुसरा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी १२ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयी ट्रॅकवर आला. मुंबईने लीगमधील अापल्या दुसऱ्या सामन्यात विराट काेहलीच्या यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला. मुंबई इंडियन्सने ६ धावांनी रंगतदार सामना जिंकला. यासह मुंबईला दुसऱ्या सामन्यातून यंदाच्या लीगमधील किताबाच्या आपल्या  माेहिमेला सुरुवात करता आली. दुसरीकडे बंगळुरू संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. आता बंगळुरूचा लीगमधील तिसरा सामना रविवारी हैदराबादशी हाेणार आहे. 


प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ८ बाद १८७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला आपल्या घरच्या मैदानावर ५ गड्यांच्या माेबदल्यात १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. संघाकडून डिव्हिलीयर्सने (नाबाद ७०) एकाकी झुंज दिली. मात्र, त्याला आपल्या टीमचा सलग दुसरा पराभव टाळता आला नाही. काेहलीने ४६ धावांचे याेगदान दिले.   तीन वेळच्या मुंबई इंडियन्सचा  स्पर्धेतील चाैथा सामना उद्या शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबशी हाेईल. तसेच काेहलीच्या बंगळुरू संघाला रविवारी यजमान सनरायझर्स हैदराबादच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. 


चहलचा विकेटचा चाैकार :

बंगळुरू संघाच्या यजुवेंद्र चहलने सामना गाजवला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना विकेटचा चाैकार मारला. त्याने चार षटकांत ३८ धावा देताना ४ बळी घेतले. 

 

विराट काेहलीच्या  ५ हजार धावा झाल्या पूर्ण 
 

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट काेहलीने आता आयपीएलच्या   करिअरमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. त्याने १६५ व्या सामन्याच्या १५७ व्या डावातून हा पराक्रम गाजवला. त्याने ३८.१७ च्या सरासरीने हा आकडा गाठला आहे. त्याच्या नावे ३४ अर्धशतके आणि चार शतकांची नाेंद आहे. आता त्याने ४६ धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...