International Special / पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू असताना पतीला लागली 556 कोटी रूपयांची लॉटरी, कोर्टाने त्यापैकी अर्धी रक्कम पत्नीला देण्याचे दिले आदेश


आर्बिट्रेटरच्या आदेशावर दोघे 2 वर्षे वेगळे राहीले

दिव्य मराठी

Jun 24,2019 02:54:28 PM IST

वॉशिंग्टन- अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या रिचर्ड डिक जेलास्कोला त्यावेळेस खूप आनंद झाला, जेव्हा त्याला 565 कोटी(80 मिलियन डॉलर)रूपयांची लॉटरी लागली. पण आता न्यायालयाने आदेश दिला आहे की, जिंकलेल्या पैशांमधील अर्धे पैसे त्याला पत्नीला द्यावे लागतील. रिडर्डला जेव्हा लॉटरी लागली तेव्हा त्याचा पत्नीसोबत न्यायलयात घटस्फोटाचा खटला सुरू होता.

या निर्णयाविरूद्ध रिचर्डच्या वकीलाने रिव्ह्यू पिटीशन दाखल केली आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, लॉटरी लागणे हे रिचर्डचे नशीब होते,त्यामुळे यातील हिस्सा पत्नीला देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. या निर्णयाविरूद्ध रिचर्ड सुप्रीम कोर्टात जाणार आहे.


आर्बिट्रेटरच्या आदेशावर दोघे 2 वर्षे वेगळे राहीले
रिचर्डचे लग्न 2004 मध्ये मेरी बेथ जेलास्कोसोब झाले होते. त्यांना तीन आपत्ये आहेत. 2013 मध्ये रिचर्डला जेव्हा लॉटरी लागली, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता. त्यावेळी कोर्टाच्या आदेशावरून दोघे दोन वर्षे वेगळे रागीले. दोघांनी आर्बिट्रेटर जॉन मिल्सचा आदेश ऐकण्याचे ठरवले.

X