आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झाला Micromax iOne, जाणून घ्या फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- Micromax कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये iOne हा फोन लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 4,999 रूपये असून याला ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आले आहे. किंमतीनुसार, या स्मार्टफोनची टक्कर Xiaomi Redmi Go आणि XOLO Era 4X सारख्या स्मार्टफोन्स होणार आहे.

 

Micromax iOne फीचर्स
या फोनमध्ये वाइड-नॉच देण्यात आले आहे. यामध्ये 5.45 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 19:9 ठेवण्यात आला आहे असूम हा फोन Unisoc SC9863 ऑक्टा-प्रोसेसरसहीत 2 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन अँड्रॉइड पायवर काम करतो. या फोनमध्ये मॅटे प्लास्टिक बॅकपॅनल देण्यात आले आहे.


कॅमेरा आणि बॅटरी
या फोनच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा सेंसर उपलब्ध आहे. याचा कॅमेरा अॅडव्हांस्ड रिअल टाइम बोकेह, टाइम लॅप्स आणि स्लो मोशन फीचर्ससोबत येतो. या फोनमध्ये 2200 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

 

Xiaomi Redmi Go के फीचर्स
यामध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रेझ्योल्यूशन 720x1280 पिक्सल आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट प्रोसेसर आणि 1 जीबी रॅमवर चालतो. यात 8 जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. हा अंड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा एलईडी प्लॅशसोबत देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा एचडीआर सेंसर यामध्ये आहे. फोनमध्ये मायक्रो यूएसबी आणि 3.5 एमएमचा ऑडियो जॅकसुद्धा दिला आहे. यामध्ये 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...