आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला फॉर्च्यून बिझनेस पर्सन ऑफ द इयर; भारतीय वंशाचे बंगा, जयश्री उलालही टॉप २० मध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्या नाडेला, जयश्री उलाल, अजय बंगा - Divya Marathi
सत्या नाडेला, जयश्री उलाल, अजय बंगा

वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची फॉर्च्यूनच्या बिझनेस पर्सन ऑफ द इयर २०१९ साठी निवड केली आहे. या यादीत जगातील २० अशा सीईओची निवड केली आहे, ज्यांनी कठीण उद्दिष्ट साध्य केले, अशक्य संधी कॅश केल्या आणि सृजनशील पद्धतीने उपाय शोधला त्यामध्ये नाडेला प्रथम क्रमांकावर राहिले.यादीत नाडेला यांच्याशिवाय भारतीय वंशाचे अजय बंगा आणि जयश्री उलाल यांना स्थान मिळाले आहे. मास्टर कार्डचे सीईओ बंगा ८ वे आणि अरिस्ताच्या प्रमुख उलाल १८ व्या क्रमांकावर आहेत. फॉर्च्यूनने मंगळवारी ही यादी प्रसिद्ध केली. सत्या नाडेला २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा महसूल सतत वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मायक्रोसॉफ्टचा नफा ३९ अब्ज डॉलर आणि महसूल १२६ अब्ज डॉलर राहिला. कंपनीचा तीन वर्षांचा एकत्रित वार्षिक महसूल वृद्धी दर ११% आणि नफा वाढ २४% आहे. एप्रिलमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रथमच १ ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलावर पोहोचली होती. अॅपलसह जगातील ४ कंपन्याच इथपर्यंत पोहोचू शकल्या आहेत. यादीत फॉर्च्यूनकडून जारी केलेल्या निवेदनात नमूद केले की, उद्योग जगतात शांत स्वभावाच्या नेतृत्वाने आपली पकड निर्माण केली आहे. परिणाम आणि टीम आधारित लीडरशिप देण्यात बिझनेसपर्सन ऑफ द इयर सत्या नाडेलापेक्षा जास्त प्रभावित अन्य कुणी केले नाही. नाडेला बिल गेट्सप्रमाणे एक संस्थापक नाहीत, तसेच ते आपले आधीचे सहकारी स्टीव्ह बामर यांच्याप्रमाणे सेल्स लीडर राहिले आहेत.  त्यामुळे त्यांनी फॉर्च्यूनच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त करणे महत्त्वपूण्र ठरले आहे. २०१४ मध्ये  मायक्रोसॉफ्ट कंपनीने जेव्हा त्यांच्याकडे नेतृत्व सोपवले होते तेव्हा सर्वच लोक हैराण झाले होते. मात्र, अशा स्थितीतही त्यांनी या वर्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखवले. अजय बंगा २०१० पासून मास्टर कार्डचे सीईओ आहेत. त्यांच्या दृष्टिकोनामुळे मास्टर कार्डला नवी ओळख मिळाली आहे. कंपनीच्या समभागात या वर्षी ४०% तेजी आली आहे. जयश्री उलाल २००८ मध्ये सिस्को सोडून अरिस्ताच्या सीईओ झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली अरिस्ता ओपन सोर्स क्लाऊड सॉफ्टवेअरमध्ये स्पेशलाइज्ड मार्केट लीडर झाल्या. कंपनीचा चालू नफा गेल्या वर्षी ३१.५% पोहोचला आहे, सिस्कोचा २८% होता.टॉप-१० मध्ये समाविष्ट सीईओंची यादी व कंपन्या


रँक    सीईओ    कंपनी

१.    सत्या नाडेला    मायक्रोसॉफ्ट

२.    एलिझाबेथ गेन्स    फोर्ट््क्यू मेटल ग्रुप

३.    ब्रायन निकॉल    चिपोटले मॅक्सिकन ग्रिल

४.    मारग्रेट कीन    सिंक्रोनी फायनान्शियल

५.    ब्रॉन गुल्ड    प्युमा
 
६.    ट्रिसिया ग्रिफिथ    प्रोग्रेसिव्ह

७.    फेब्रिजिओ फ्रेडा    एस्टे लॉडर

८.    अजय बंगा    मास्टर कार्ड

९.    डब्ल्यू क्रेग    जेलनेक कोस्तको

१०.    जेमी डायमन    मॉर्गन चेज

बातम्या आणखी आहेत...