आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क - मायक्रोसॉफ्टने आपला दोन स्क्रीनचा फोन लॉन्च केला. बुधवारी कॅलिफॉर्नियात पार पडलेल्या मायक्रोसॉफ्ट सर्फेस इव्हेंटमध्ये कंपनीने नवीन सर्फेस लॅपटॉपसोबत लेटेस्ट डुअल स्क्रीनचा फोन सर्फेस डुओ लॉन्च केला. मायक्रोसॉफ्टचा हा फोल्डेबल स्मार्टफोन नुकताच लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलक्सी फोल्डला टक्कर देणार आहे. हा स्मार्टफोन अँड्राईड ओएसवर काम करते. पुढील वर्षापासून फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. हा फोन पॉकेटमध्ये ठेवता येणारे पहिले सर्फेस डिव्हाइस असल्याचे कंपनीने सांगितले.
ट्रेंडिंग फोल्डेबल फोनपेक्षा वेगळा आहे सर्फेस डुओ
> या स्मार्टफोनमध्ये 5.6 इंचच्या दोन पातळ स्क्रीन्स आहे. फोनला अनफोल्ड केल्यावर यात 8.63 इंच डिस्प्ले साइज मिळले. या फोनचा अनेक प्रकारे वापर करता येईल.
> याअगोदर मायक्रोसॉफ्टने विंडो बेस्ड स्मार्टफोन बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण अँड्राईड आणि अॅपल आयओएससमोर ते टिकू शकले नाही.
> मायक्रोसॉफ्टच्या या नवीन डिव्हाइस सर्फेस डुओमध्ये गूगल प्ले स्टोरवरून अॅप्स डाउनलोड करून चालवता येणार आहे.
> फोल्डेबल स्क्रीन ऐवजी हा ट्रेंडिंग फोल्डेबल फोनपेक्षा वेगळा आहे. यात दोन वेगवेगळ्या स्क्रीन हिंजच्या मदतीने एकमेकांसोबत जोडलेली आहे. यामुळे स्क्रीनच्या मध्यभागी एक गॅट दिसतो. यामुळे एखादे अॅप किंवा फोटो दोन्ही स्क्रीन्सवर एकाचवेळी पाहणे थोडे विचित्र वाटेल.
> फोनच्या दुसऱ्या स्क्रीनला टायपिंग आणि गेमिंग कंट्रोलसाठी वापरता येणार आहे. ही कॉन्सेप्ट याअगोदर एलजी डुअल स्क्रीन आणि गेमिंग फोन आसुस रोगमध्ये बघितले गेले आहे.
> कंपनीने फोनचे स्पेसिफिकेशन जारी केले नाहीत. पण 360 डिग्री फोल्ड होणारा हा फोन हिंजसोबत कनेक्टेड असल्याचे सांगितले आहे. यामुळे स्क्रीनला फोल्ड केल्यानंतर तुम्ही त्याचा विविध प्रकारे उपयोग करू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.