आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली : कॉम्प्युटर क्षेत्रातली अग्रेसर कंपनी मायक्रोसॉफ्टने आज आपल्या सर्वात छोट्या आणि स्वस्त सर्फेस डिवाइस 'सर्फेस गो' ची भारतात विक्री करण्याची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवरून 38,599 रूपयांच्या सुरुवाती किंमतीने याची खरेदी करता येणार आहे. याचे वजन फक्त 522 ग्राम आहे. मल्टीपर्पज युझसाठी या डिवाइसचा वापर करता येतो. हे डिवाइस लॅपटॉप, टॅबलेट आणि स्टुडिओ मोडमध्ये वापरता येते.
क्रिएटिव्ह लोकांसाठी आहेत अनेक मजेदार फीचर्स
सर्फेस गो या डिवाइससोबत एक सर्फेस पेन येतो. याद्वारे क्रिएटिव्ह लोक पेंटिंगसारखे इतर क्रिएटिव्ह काम करू शकतात. यामध्ये एक कस्टम कॅलिब्रेटेड 3:2 डिस्पले आहे जो एका बिल्ट-इन फूल फ्रिक्शनसोबत येतो. यामुळे हे डिवाइस 165 डिग्रीपर्यंत उघडते. यामध्ये फास्ट चार्जिंग होण्यासाठी सर्फेस कनेक्ट येते. तर ऑडिओसाठी हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन
प्रोसेसर - intel pentium Gold Processor
स्टोरेज - 8GB DDR2 रॅम, 128GB SSD ROM
ऑपरेटिंग सिस्टम - 64 विट् विंडोज 10
डिस्पले - 25.4cm (10 इंच) टच स्क्रीन डिस्पले
वॉरंटी - 1 वर्ष
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.