आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युराेपप्रमाणे भारतातही डाटा सेंटरची उभरण्याची ‘मायक्रोसॉफ्ट’ची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेडमंड (वॉशिंग्टन) - भारतासह सर्व देशांच्या डाटा सुरक्षा कायद्याचे पालन करणार असल्याचे तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टचे सायबर सिक्युरिटी सोल्युशन समूहाची कॉर्पोरेट उपाध्यक्ष एन जॉन्सन यांनी एका विशेष मुलाखतीत सांगितले की, “आम्ही विविध देशांमधील डाटा नियमांचे पालन करणार आहोत. ते आमच्यासाठी अनिवार्य आहे. युरोपियन युनियनच्या नियमांचे आम्ही आधीच पालन केले आहे. तसेच अाम्ही इतरही देशांतील नियमांचे पालन करणार आहोत.’  अॅपलसह तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी मुक्त प्रवाहाची मागणी केली असतानाच जॉन्सन यांनी सांगितले की, “वेळेनुसार सायबर धोक्यांमध्ये वाढ होत आहे.

 

सायबर गुन्हेगारांच्या विरोधात इंटेलिजन्स प्रणाली अधिक सक्षम बनवण्यासाठी देशांच्या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचा एनक्रिप्टेड डाटाचा मुक्त प्रवाहदेखील असायला हवा. यामुळे सुरक्षा प्रणाली आणखी चांगली बनवण्यासाठी आपल्याला मदत मिळेल.’

 

जगभरात १२० कोटी लोकांकडून मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर  

जगभरात १४० देशांतील १२० कोटींपेक्षा जास्त लोक १०७ भाषांमध्ये त्यांच्या कॉम्प्युटर-लॅपटॉप आदींमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करतात. त्यांच्या डाटाची सुरक्षा करणे मोठे काम आहे. सायबर सुरक्षेप्रति जागृत कंपन्या अाणि ज्या नियामकांनी नियम तयार केले आहेत, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसपासून ते प्लॅटफॉर्मपर्यंत उपाय करत आहे.  

 

सायबर धोक्यांशी संबंधित संकेतांचे विश्लेषण सुरू

 

 -४०,००० कोटी आउटलूक ई-मेल  
- १२० कोटी मायक्रोसॉफ्ट डिव्हाइस  
- ७५ कोटींपेक्षा जास्त क्लाउड खाती  
- २०० जागतिक संचालक अन् कमर्शियल सर्व्हिसेस  
(मायक्रोसॉफ्ट इंटेलिजंट सिक्युरिटी ग्राफनुसार)

बातम्या आणखी आहेत...