आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूज डेस्क - गोव्यात भारतीय नौदलाचे मिग-29के लढाऊ विमान शनिवारी दुपारी कोसळले आहे. प्रशिक्षणाच्या मोहिमेसाठी उड्डान घेतल्याच्या अवघ्या काही सेकंदातच ही दुर्घटना घडली. यामध्ये एक अनुभवी आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. या दोघांनीही ऐनवेळी विमानातून इजेक्ट केल्याने ते सुखरूप बचावले आहेत. हे विमान खास प्रशिक्षणासाठी बनवण्यात आलेले विमान होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खास ट्रेनिंगसाठी बनवलेले विमान मिग-29के दाबोळी येथील आयएनएस हंसावरून निघाले होते. प्रशिक्षण मोहिमेवर निघालेल्या या विमानामध्ये कॅप्टन एम. शेवखांड आणि लेफ्टनंट कॅडर दीपक यादव प्रवास करत होते. त्यांनी शनिवारी दुपारी उड्डान घेताच विमानातील इंजिनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. क्षणार्धात ही आग पसरली आणि वेळीच दोन्ही वैमानिकांनी एमरजेंसी एक्झिट केले. या दोन्ही वैमानिकांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.