आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिग-२९ चे अपग्रेडेशन २०२१ पर्यंत पूर्ण होऊन वायुदलाची वाढणार ताकद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतीय वायु सेनेच्या प्रमुख युनिटपैकी ओझर येथील ११ बेस देखभाल दुरूस्ती डेपो असून या ठिकाणी लढाऊ एअरक्राफ्टच्या देखभाल व दुरूस्तीचे काम केले जाते. या ठिकाणी वायुदलाची प्रमुख ताकद असलेल्या मिग-२९ वायुदलाकडे असणाऱ्या मिग-२९चे अपग्रेडेशन २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. अपग्रेडेशेनमुळे मिग-२९ ची अधिक आयुष्यमान, क्षमता वाढणार असल्याने असल्याने वायुदलाबरोबर भारतीय सैन्याचीही ताकत वाढणार असल्याची माहिती ११ बीआरडीचे एअर कमांडर समीर बोराडे यांनी सांगितले. 


वायूदल स्थापना दिवस ८ ऑक्टोबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा वायुसेनेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त ओझर येथील ११ बेस देखभाल व दुरूस्ती डेपो येथे होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि. २८) माध्यम प्रतिनिधींचा दौरा आयोजित करण्यात आला होता. शत्रूराष्ट्र विरोधात युद्ध, भूकंप, महापूर यासारखी नैसर्गिक आपत्तीत वायुदलाची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. वा युदलाची ताकद असलेल्या मिग-२९ च्या देखभालीचे काम ओझरच्या डेपोत सुरूवात करण्यात आली. वायुदलाला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच मिग-२९ चे अपग्रेडेशन करताना त्यात मिसाईल, गाईडिंग बॉम्ब, गन अशा शस्त्रास्त्रांचा समावेश करण्यात आला आले. याचबरोबरच सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे. 


कॉकपीटची जागा, पंख्यांची लांबीही वाढवल्याने हवेत थांबवण्याच्या क्षमतेत वाढ झाली. अत्याधुनिक यंत्रणा, वेपन्स क्षमता, उड्डाणादरम्यान इंधन भरण्याच्या क्षमतेत अपग्रेडेशन करण्यात सक्षम झाले आहे. या अपग्रेडेशन प्रक्रियेला २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. एक मिग-२९ पूर्ण अपग्रेडेशन करण्यासाठी १७ महिने लागतात. ओझरच्या डेपोमध्ये वायुदलातील मिग-२९ पैकी आतापर्यंत ५० टक्के एअरक्रॉफ्टचे अपग्रेडेशन पूर्ण करण्यात आले अाहे. उर्वरित २०२१ पर्यंत करण्यात येणार असल्याचे यावेळी बोराडे यांनी सांगितले. याचबरोबच या ठिकाणी सुखोई-३० एमकेआय विमानाचे संपूर्ण ओव्हर्लिंग करण्याचे काम करण्यात येते. याच वर्षी २४ एप्रिलमध्ये ओव्हर्लिंग केलेल्या मिगने केलेले यशस्वी उड्डाण आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे बोराडे यांनी सांगितले. 


आयएसओ मानांकन प्राप्त एकमेव डेपो 
भारतीय वायुसेनेचा हा पहिला असा डेपो आहे की ज्याला आयएसओ मानांकन प्राप्त आहे. या डेपोला आयएसओ ९००१-२०१५ आणि १४००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. 


पंतप्रधान मोदींनी केले हाेते कौतुक 
सुखोई-३० च्या पूर्ण देखभाल व दुरूस्तीचे कार्य या ठिकाणी करण्यात येत आहे. २०१७ मध्ये वायुसेनेच्या वर्धापनदिनी नरेंद्र मोदी यांनी सुखोई-३० एमके आयच्या इंजेक्शन सीटच्या परिक्षणाची प्रशंसा केली होती. 

बातम्या आणखी आहेत...