आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mika Singh And Daler Mehndi Elder Brother Amarjeet Singh Died On Monday Night In Delhi

मिका सिंगच्या थोरल्या भावाचे निधन, सोमवारी उशीरा रात्री हास्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास, दिल्लीत आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गायक मिका सिंग  आणि दलेर मेहंदी यांचे थोरले भाऊ अमरजीत सिंग यांचे सोमवारी उशीरा रात्री निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिका सिंगने भावाच्या निधनावर शोक व्यक्त करताना लिहिले, "वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह, आम्हाला सांगताना अतिशय दुःख होतंय की, आमचे थोरले बंधू अमरजीत सिंग यांचे निधन झाले आहे, ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. अमरजीत पाजी स्वर्गात निघून गेले." 


संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यसंस्कार...  
- अमरजीत यांच्या निधनावर त्यांचे भाऊ दलेर मेहंदी, हरजीत मेहंदी, जोगिंदर सिंग आणि मिका सिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. मिका आणि दलेर यांना म्युझिकमध्ये करिअर करण्यासाठी अमरजीत यांनी पाठिंबा दिला होता.

- अमरजीत यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास दिल्लीतील टिळक विहार स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
- मिका सिंग पहिल्यांदा 'सावन में लग गई आग' या गाण्याने चर्चेत आला होता. मिकाने सलमान खानसाठी अनेक गाणी गायली आहेत. 
- तर दलेर मेहंदी 1995 मध्ये आलेल्या 'बोलो ता रा रा', 'तुनक तुनक तुन' आणि 'हो जाएगी बल्ले बल्ले' या गाण्यांमुळे लोकप्रिय झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. 

 

We are deeply saddened to inform you of the demise of Amarjeet Singh our elder brother who had been hospitalised over the last few days. Amarjeet Bhaji departed for his heavenly abode today early morning. The cremation will take place at 5pm today at Tilak Vihar Cremation Ground pic.twitter.com/HHbrqU69ut

— King Mika Singh (@MikaSingh) October 29, 2018

We are deeply saddened to inform you of the demise of Amarjeet Singh our elder brother who had been hospitalised over the last few days. Amarjeet Bhaji departed for his heavenly abode today early morning. The cremation will take place at 5pm today at Tilak Vihar Cremation Ground pic.twitter.com/XF6MOoPa2K

— Daler Mehndi (@dalermehndi) October 29, 2018

 

बातम्या आणखी आहेत...