• Home
  • Gossip
  • Mika Singh Faces Severe Backlash For His Performance In Karachi

सोशल मीडिया / कराचीमध्ये परवेज मुशर्रफच्या नातेवाईकाच्या लग्नात मीका सिंगने केले परफॉर्म; युझर्सनी सोशल मीडियावर अशाप्रकारे व्यक्त केला राग

मेहंदी कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी मीकाला मिळाले तगडे मानधन

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 01:22:51 PM IST

बॉलीवूड डेस्क - बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंगला नेटकऱ्यांनी निशाण्यावर धरले आहे. मीकाने पाकिस्तानात कार्यक्रम सादर केल्यामुळे सोशल मीडियावर लोक त्याच्यावर टीका करत आहेत. मीकाने गेल्या काही दिवसांत कराची येथे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफच्या जवळील नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केला होता. त्याच्या या परफॉरमेंसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भारतीय चाहत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


सोशल मीडियावर व्यक्त केला राग:
एकीकडे पाकिस्तानने भारतासोबत सर्व संबंध संपवले आहेत. तर दूसरीकडे अशा परिस्थितीत पाकिस्तानाता परफॉर्म करतेवेळी लाज वाटायला हवी अशी संतप्त प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर मीकाचे पासपोर्ट आणि नागरिकत्व रद्द करा, त्याला पाकिस्तानातच राहू द्या असे दुसऱ्या युझरचे म्हणणे आहे. एका युझरने लिहिले की, काहीतरी लाज बाळगा. दुसऱ्या युझरने लिहिले की, पाजी या देशाने तुम्हाला इतके दिले. पण तुम्ही देखील गद्दार निघालात, थू...

परफॉर्म करण्यासाठी मिळाले तगडे मानधन:
मीकाने 8 ऑगस्ट रोजी पाकिस्तानात मुशर्रफच्या नातेवाईकाच्या मेहंदी कार्यक्रमात परफॉर्म केले होते. या कार्यक्रमासाठी तो आपल्या 14 जणांचा ग्रुपसोबत गेला होता. रिपोर्ट्सनुसार मीका येथे परफॉर्म करण्यासाठी 1.06 कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

X
COMMENT