आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mika Singh Who Arreted For Sexual Assault Controversy In Dubai Rakhi Sawant Cried For Him

मीका सिंगला अटक झाल्यानंतर हमसून-हमसून रडली राखी सावंत. म्हणाली - का कांड करतोस मीका, कुणी 17 वर्षांच्या मुलीची छेड काढतो का? तुला सोडवायला मी दुबईत येतेय : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मीका सिंगवर 17 वर्षांच्या ब्राझिलियन मॉडेलवर लैंगिक छळ केल्याचा आरोप लागला आहे. याप्रकरणी दुबई पोलिसांनी मीकाला बेड्या ठोकल्या आहेत. ही बातमी राखी सावंतला समजताच ती काळजीत पडली आहे. राखीने इंस्टाग्रामवर मीकाविषयी काळजी व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती रडताना दिसतेय. राखी व्हिडिओत म्हणतेय, ''मीका तू किती लफडे करतोस, मी आता दुबईत येतेय तुझी सुटका करण्यासाठी... व्हिजाच्या प्रतिक्षेत आहे... मीका तू किती कांड करतोस..''


 12  वर्षे जुन्या वादाची राखीने काढली आठवण...  
- राखीने आणखी एक व्हिडिओ युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. यात ती मीकाला उद्देशून म्हणतेय "तू माझा मित्र आहेस, का माझ्या अब्रूशी खेळतो आहेस..''


- यावेळी राखीने मीकासोबत झालेल्या 12 वर्षे जुन्या वादालाही मध्ये आणले आहे. ती म्हणाली, ''तुला ठाऊक आहे ना हे दुबईचे पोलिस आहेत, मुंबईचे नाही. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती, तेव्हा पोलिस तुझे काहीच वाकडे करु शकली नव्हती."


- "दुबई पोलिस मात्र असे करणार नाही. तेथील पोलिस खूप स्ट्राँग आहेत. तू 17 वर्षांच्या मुलीचा छेड काढलीच कशाला? तुला आता लग्न करायला हवे. कधीही कुणालाही मारहाण करतो. एवढे पंगे घेतोस तू, मला याचा खूप त्रास होतोय. तु मुलींंची छेड का काढतोस?''


- मीकाने 2006 मध्ये आयटम गर्ल राखी सावंतला तिच्या वाढदिवशी केक कापल्यानंतर सर्वांसमोर लिपलॉक केले होते. यावरुन बराच वादंग निर्माण झाला होता. राखी यासाठी कोर्टात गेली होती. बरेच दिवस हे प्रकरण चर्चेत होते.


-  मीकावर 17 वर्षीय ब्राझिलियन तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला आहे. ब्राझिलियन युवतीने आरोप केला आहे की, मीकाने काही अश्लिल छायाचित्रे तिला पाठवली. मीकाला सध्या दुबईच्या मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मीका एका बॉलिवूड इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी दुबईत गेला होता. 

 

 

 

 

लाइव्ह इव्हेंटमध्ये डॉक्टरला केली होती मारहाण...

- 2015 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या एका इव्हेंटमध्ये मीकाने एका डॉक्टरच्या कानशिलात लगावली होती. मीकाने आरोप लावला होता की, डॉक्टरला मनाई केल्यानंतरही तो महिलांमध्ये येऊन नाचू लागला होता. त्यावर  चिडून मीकाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये त्याला मारले होते.


- 2014 मध्ये मीका हिट अँड रन केसमध्येही अडकला होता. त्याच्यावर ऑटो रिक्शाला धडक दिल्याचा आरोप होता. यावेळी ऑटोतील प्रवाशी जखमी झाले होते. त्यावर गाडी चालवत नसल्याचे स्पष्टीकरण मीकाने दिले होते.


कस्टम चोरीचा लागला होता आरोप...
- मीका सिंगवर कस्टम चोरीचाही आरोप लागला होता. 2013 मध्ये कस्टम अधिका-यांनी मुंबई एअरपोर्टवर त्याला अडवले होते.


- मीका बँकाकहून मुंबईत परतत असताना त्याच्याजवळ मर्यादेपक्षा अधिक विदेशी चलन होते, त्यामुळे ग्रीन पॅनल ओलांडत असताना कस्टम अधिका-यांनी त्याला अटक केली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. 

 

खरे नाव अमरीक सिंह
- मीकाचे खरे नाव अमरीक सिंग आहे. पण बॉलिवूडमध्ये तो मीका सिंग या नावाने ओळखला जातो. 'तुनक-तुनक धिन ताना ना'च्या धूनवर तरुणाईला वेडे करणारे प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीचा मीका धाकटा भाऊ आहे.


- मीकाने पॉप म्युझिकमध्ये नाव कमावले. आज बॉलिवूडमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी किंग मीका सिंगला मोठी डिमांड आहे.  

बातम्या आणखी आहेत...