आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला आणखी एक धक्का, अवघ्या चार महिन्यातच मिलिंद देवरांनी सोडले मुंबई काँग्रेस अध्यक्षपद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, त्यानंतर एक-एक करत अनेक काँग्रेस नेत्यांनी आपले राजीनामे दिले. यातचा आता भर पडली ती म्हणजे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा. मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मिलिंद देवरांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.


मिलिंद देवरा यांनी राजीनामा देताना त्यांनी आगामी विधासभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहराचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांची एक कमिटी स्थापना करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान मिलंद देवरां यांना काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिल्लीला जावे लागणार असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाने मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा सांभाळण्यास दिली होती. पण, निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांना कमी वेळ मिळाल्याने काँग्रेसला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे  काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.


कोण आहेत मिलिंद देवरा
मिलिंद देवरा माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. 2014 साली त्यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली होती, पण शिवसेनेच्या अरविंद सावंतांनी त्यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव झाला होता.