आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी संघाच्या शाखेमध्ये जायचा मिलिंद सोमण, पुस्तकात लिहिले - 'तेथील माझा अनुभव अगदी वेगळा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आजकाल आपल्या 'मेड इन इंडिया' या पुस्तकाबद्दल चर्चेत आहेत. या पुस्तकात त्याने असेही सांगितले आहे की काहांपणी तो आरएसएसच्या (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) शाखांनादेखील जायचा. त्या दिवसांच्या आठवणी सांगताना सोमणने पुस्तकात असे लिहिले की, संघाचा संबंध जेव्हा जातीयवादाशी जोडला जातो तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटते.

सोमणने पुस्तकात सांगितले त्यावेळी तो मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शाखा किंवा प्रशिक्षण केंद्रांमध्ये जायचा. त्याचे पिता संघाचा भाग होते. त्यांची मान्यता होती की, लहानपणी शाखेत गेल्यने एका तरुण मुलाला शिस्तबद्ध जीवन जगणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आणि चांगली विचारसरणी यासारखे बरेच फायदे होतात. तसेच, ही अशी एक गोष्ट होती जी आजूबाजूची अनेक तरुण मुले करायची. या पुस्तकात सोमणने असेही सांगितले होते की त्याचे वडील आरएसएसचा भाग होते आणि स्वत: ला गौरवशाली हिंदू मानायचे. मात्र त्याने लिहिले, 'मला अभिमान वाटण्यासारखे काहीही दिसले नाही, परंतु दुसरीकडे मला तक्रार करता येण्यासारखेही काही दिसले नाही.'

'माझा अनुभव अगदी वेगळा'

'द प्रिंट' नुसार आपल्या पुस्तकात सोमणने लिहिले, 'मी आज जेव्हा संघाच्या शाखांबद्दल मीडियामध्ये सुरु असलेला प्रचार पहातो, ज्याप्रकारे त्यावर विध्वंसक आणि जातीयवादी असल्याचे आरोप केले जातात त्यामुळे मी खरंच हैरान होतो. संघाच्या माच्या शाखेत दररोज संध्याकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान जे काही व्हायचे, त्याच्याशी निगडित माझ्या आठवणी अगदी वेगळ्या आहेत. आम्ही तिथे खाकी शॉर्ट्समध्ये मार्च करायचो, योगा करायचो, फॅन्सी उपकरणांऐवजी पारंपरिक वस्तूंसोबत मोकळ्या वातावरणात व्यायाम करायचो, खेळ खेळायचो, साथीदारांसोबत मस्ट करायचो, गाणी गायचो आणि संस्कृत मंत्रांचे उच्चारण करायचो, ज्यांचा अर्थ आम्हाला माहित नसायचा.'

'आम्ही ट्रॅकिंग करायलादेखील जायचो'

शाखेशी संबंधित आणखी एक अनुभव सांगत सोमणने लिहिले की, 'कधीकधी आम्हाला मुंबईच्या डोंगरावर ट्रेकिंग किंवा रात्रीच्या वेळी कॅम्पिंगवर नेले जायचे. आम्ही उत्सुकतेने त्याची वाट पाहायचो आणि तिथे आम्ही त्याचा आनंद घ्यायचो. आम्ही तिथे जे काही करायचो ते चांगल्या प्रशिक्षित लोकांच्या पथकाच्या देखरेखीत करायचो. जेव्हा तिथे ते लोक नसत तेव्हा काही वयस्कर असायचे, जे हे समजून मदत करायचे की, ते चांगले 'नागरिक सैनिक' तयार करण्यासाठी मदत करत आहेत. असे तरुण सैनिक जे त्यांच्या प्रयत्नातून एक राष्ट्र बनविण्यासाठी मोठे होतील.ज्यांना तुम्ही देशी स्काउट म्हणू शकता. ते आई वडिल जे आपल्या मुलांना तिथे पाठवायचे. त्यांना वाट्याचे की, मुलांना शाखेत पाठवल्यामुळे ते फिट आणि त्रासापासून दूर राहतील.'