आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापातूर- अनैतिक संबंधातून प्रौढ प्रियकराने युवतीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात युवती गंभीर जखमी झाली तर प्रौढ प्रियकराचा मृत्यू झाला. ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही घटना पातूर पासून दहा किलोमीटर अंतरावरील विवरा येथे घडली.
विवरा येथील करिष्मा ऊर्फ भुरी शेख हसन (वय २० वर्ष) हिला बोथा काझी येथील नियामत खा (वय-५० वर्ष) हे त्यांच्या मुलासाठी मागणी घालायला काही महिन्यांपूर्वी आले होते. परंतु करीष्माच्या आई वडिलांनी नकार दिला. यामुळे नियामत खा संतप्त होवून तेथून निघून गेले. मात्र काही दिवसांनी नियामत खा यांनी करीष्माच्या आई वडिलांशी वैयक्तिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नियामत खा यांचे करीष्माच्या घरी जाणे-येणे सुरु झाले. मात्र या प्रकारामुळे नियामत खा याचे करिष्माशी सूत जुळले. सहा ते सात महिन्या अगोदर करिष्मा व नियामत खा हे पळून गेले होते. याबाबत करीष्माच्या मिसिंगची तक्रारही तक्रार चान्नी ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान काही महिन्यानंतर करिष्मा व नियामत खा यांच्यात बिनसले. त्यामुळे दोन ते तीन महिन्याआधी करिष्मा घरी परत आली. या बाबतची माहितीही करीष्माच्या परिवाराने चान्नी पोलिसांना दिली होती.
दरम्यान सोमवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी शेतामध्ये करिष्मा व तिची आई शेतात काम करीत असताना आकस्मिकपणे नियामत खा शेतात आला. या वेळी नियामत खा आणि करीष्मा यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्या नंतर तयारीत आलेल्या नियामत खा याने करीष्मा व तिच्या आईच्या डोळ्यात मिरची पुड टाकून करिष्माच्या गळा आणि हातावर कोयत्याने वार केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे करीष्माच्या आईने आरडा ओरड केल्याने नियामत खा याने घटनास्थळावरून पळ काढला. पळून गेलेल्या नियामत खा याने गावातील पाराच्या मागील शेतात जावून स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. परंतु ही हत्या की आत्महत्या याचा शोध घेणे चान्नी पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे. दरम्यान जखमी करीष्माला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून , नियामत खा यांचा मृतदेह विच्छेदानासाठी पाठवण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार डी. सी. खंडेराव घटनास्थळी दाखल झाले. मात्र घटनास्थळ चान्नी ठाण्याअंतर्गत येत असल्याने, चान्नी पोलिस विलंबाने पोहोचल्याची चर्चा सुरु होती. पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.
ही आत्महत्या नसून खून
विवरा शिवारात नियामतखा यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलेला असताना ती आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत आहेत. यासंदर्भात उद्या पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत. सरदारखा सुजातखा पठाण, मृतकाचा भाऊ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.