आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या चुकीमुळे मिसाइल यूक्रेनच्या 176 प्रवासी असलेल्या विमानावर धडकल्या, इराणची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूक्रेन एअरलाइंसचे बोइंग 737-800 विमान बुधवारी इराणवरुन उडताच 3 मिनीटात क्रॅश झाले

तेहरान- इराणने आज(शनिवार) लष्कराच्या चुकीमुळे यूक्रेनचे प्रवासी विमान पडल्याची कबुली दिली आहे. सरकारकडून जारी केलेल्या वक्तव्यात हे मानवी चुक (ह्यूमन एरर) असल्याचे सांगितले. यापूर्वी इराणने मिसाइल विमानाला लागल्याच्या दाव्याचे खंडन केले होते. दरम्यान, शुक्रवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि ब्रिटिश पीएम बोरिस जॉनसन यांनी गुप्त माहितीच्या आधारे सांगितले की, विमान इराणच्या मिसाइलमुळेच क्रॅश झाले. त्यानंतर इराणने त्यांच्या या दाव्याचे खंडन करत, पुरावे सादर करण्यास सांगितले होते. पण, आज इराणने आपली चुक मान्य केली आहे. ट्रूडो आणि ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या दाव्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात  यूक्रेनचे विमान मिसाइल धडकल्यानंतर क्रॅश झाल्याचे दिसत होते. विमान अपघातात 63 कॅनडीयन 82 इराणी, 11 यूक्रेनी, 10 स्वीडिश आणि जर्मनी-ब्रिटेनचे 3-3 नागरिक सामील होते.

व्हिडिओत काय दिसत आहे ?


व्हिडिओत दिसत आहे की, परांडाच्या आकाशात विमानावर मिसाइल आदळताच विमानात अचानक आग लागली. बीबीसीने खुलासा केला होती, उड्डाण भरताच विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर विमानाने परत येण्याचा प्रयत्न केला. पण, काही वेळातच विमानात स्पोट होऊन क्रॅश झाले. पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च एजंसी बेलिंगकॅटने जियोलोकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे माहिती काढली की, हा व्हिडिओ परांडाच्या एका घरातून शूट झाला आहे.

प्रवासी विमानावर 47 वर्षात 6 वेळा मिसाइल हल्ले

कुठेतारीखकाय झाले?किती जण मारले गेले?
यूक्रेन17 जुलै 2014रशिया समर्थित विद्रोहिंनी मलेशियाच्या विमानावर हल्ला केला होता298
सोमालिया23 मार्च 2007मोगदिशुमध्ये बेलारूस एअरलाइनच्या विमानावर रॉकेट हल्ला11
ब्लैक सी4 ऑक्टोबर 2001यूक्रेनमध्ये रशियाच्या विमानावर चुकीने मिसाइल हल्ला झाला होता79
इराण3 जुलै 1988अमेरिकी वॉरशिपमधून इराण एअरलाइनच्या विमानावर हल्ला झाला290
रशिया1 सप्टेंबर 1983रशियन फायटर जेट्सने दक्षिण कोरियाच्या बोइंग-747 ला पाडले होते269
इजिप्त21 फेब्रुवारी 1973इस्राइल फायटर जेट्सने लीबियाच्या विमानावर हल्ला112

कॅनेडीयन नागरिकांना उत्तर मिळणे गरजेचे- ट्रूडो


कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगितले की, यूक्रेन एअरलाइनचे विमान तेहरानवरुन टेकऑफ करताच जमिनीवरुन हवेत मारणाऱ्या एका मिसाइलच्या संपर्कात आले. माध्यमांशी बोलताना ट्रूडो म्हणाले की, असे असू शकते की, हे मुद्दामुन केले नाही. पण, कॅनेडाच्या नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळणे गरजेचे आहे.


दुसरीकडे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसनदेखील म्हणाले की, यूक्रेन एअरलाइनचे विमान इराणच्या एका सर्फेस-टू-एअर मिसाइल लागल्याने पडले आहे. तेदेखील म्हणाले की, हे चुकीने पडले असू शकते. पण, याचा तपास करणे गरजेचे आहे. तसेच, त्यांनी पश्चिमी आशियातील देशांना शांतचेचे आवाहन केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...