आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Agra News In Marathi: Milk Flowing From A Tree In Agra And People Have Started Worshiping The Tree Now As A Symbol Of Faith

लिंबाच्या झाडातून वाहत आहे दुधाच्या धारा, लोकांच्या भक्तीचे केंद्र बनले झाड; पंचक्रोशीतील लोक करत आहेत दर्शनासाठी गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा (उत्तर प्रदेश) -  आग्रा जिल्ह्यातील एका लिंबाच्या झाडाचे फोटो व्हायरल होत आहे. गावातील लोक या झाडाची पूजा करत आहे. याचे कारण म्हणजे त्या लिंबाच्या झाडातून दूधाच्या धारा निघत आहे. यामुळे हे झाड ग्रामस्थांच्या आस्थेचे केंद्र बनले आहे. पंचक्रोशीतील लोक याठिकाणी पूजा-पाठ तसेच दर्शनासाठी गर्दी करत आहेत. हे चमत्कारीत झाड चरण दास यांच्या अंगणात आहे.

 

> चरण दास यांचे म्हणणे आहे की, देवाने त्यांच्या स्वप्नात येऊन लिंबाच्या झाडातून दूध निघत असल्याचे सांगितले. चरण दास यांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांनी या घटनेबाबत गावकऱ्यांना सांगितले. ग्रामस्थांनी याला देवाचा चमत्कार समजत याठिकाणी भजन-किर्तन, पूजा-पाठ करण्यास सुरूवात केली आहे. 

 

> यामागे काही वैज्ञानिक कारण असण्याची शक्यता आहे. पण लिंबाच्या झाडातून दूध येत असल्याची बातमी आस-पासच्या गावांत पसरली, तेव्हा पंचक्रोशीतील ग्रामस्थ याठिकाणी गर्दी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...