आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Millions Of Students Took To The Streets In 2400 Cities In 157 Countries, Protesting Around The World For Environmental Protection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

157 देशांतील 2400 शहरांत लाखो विद्यार्थी उतरले रस्त्यावर, पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात निदर्शने

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र बर्लिनच्या ब्रँडनबर्ग गेटचे आहे. जर्मनीत 500 शहरांत मार्चमध्ये 2 लाखांहून जास्त लोक सहभागी झाले होते. - Divya Marathi
छायाचित्र बर्लिनच्या ब्रँडनबर्ग गेटचे आहे. जर्मनीत 500 शहरांत मार्चमध्ये 2 लाखांहून जास्त लोक सहभागी झाले होते.

लंडन/ बर्लिन/ टाेकियो : जगभरात पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेने शुक्रवारी पुन्हा जोर धरला आहे. १५७ देशांतील २४०० शहरांत लाखो विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालये सोडून पर्यावरण जागरूकतेसंबंधी रॅलीही काढण्यात आल्या. त्याचबरोबर सरकारने याबाबत तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. स्पेनमध्ये २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या यूएन कॉप-२५ संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन महत्त्वाचे मानले जाते. फ्रायडेज फ्यूचर मोहिमेत ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया व भारतासह अनेक देशांतील विद्यार्थ्यांनी सरकारी इमारती व ऐतिहासिक ठिकाणीही या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतले. ब्रिटनच्या सर्व शहरांत विद्यार्थी व तरुणांनी मोर्चा काढला आणि पुुढील महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत त्यात महत्त्वाचा मुद्दा बनवण्याचीही मागणी केली. ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थ्यांनी वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या अपयशामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी संसद व लिबरल पार्टीच्या मुख्यालयास घेराव घातला. जपानमध्ये टोकियो, क्यूडो, आेसाकामध्येही विद्यार्थ्यांनी विराेध दर्शवला. बर्लिनमध्ये पर्यावरण कार्यकर्त्यांनी स्प्री नदीत उतरून सरकारच्या पर्यावरण धोरणांवर टीका केली.

अंटार्क्टिकाच्या शेटलँड बेटावर यंदा ८० हजार पर्यटकांची गर्दी झाली होती. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. पेंग्विनच्या सोबतीने पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या बेटाला पसंती आहे. दरवर्षी पेंग्विनच्या संख्येत २५०० ने घट होत आहे.

कारवाई : ईयूवर दबावासाठी युरोपीय संसदेने हवामान बदल आणीबाणीची घोषणा केली

युरोपीय संसदेने गुरुवारी हवामान बदलविषयक आणीबाणी जाहीर केली. अशा प्रकारे घोषणा करणारा हा पहिला खंड ठरला. स्ट्रॉसबर्ग येथील संसदेत यूएन कॉप-२५ संमेलनापूर्वी हवामान बदलावर चर्चा झाली. युरोपीय संघाने याबाबत कडक निर्णय घ्यावा म्हणून दबाव वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

स्टडी : हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेला ३ दशकांत ३ टक्के नुकसान शक्य

हवामान बदलामुळे आगामी ३० वर्षांत जगभरातील अर्थव्यवस्थेला ३ टक्के एवढा फटका बसला, असा दावा अमेरिकेतील इकॉनॉममिक इंटेलिजन्स युनिटच्या अभ्यासातून करण्यात आला. त्यानुसार हवामान बदलामुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान दक्षिण अमेरिका, आफ्रिका व मध्यपूर्वेचे झाले.

भारत : मुंबई, चेन्नई व बंगळुरूमध्ये निदर्शने

शुक्रवारी दिल्लीसह देशाची आर्थिक राजधानी व आयटी शहरांतही हवामान बदलाच्या समस्येवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुंबईत गेल्या ३७ आठवड्यांपासून दर शुक्रवारी विद्यार्थी एकत्र येतात.
 

बातम्या आणखी आहेत...