आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Millions Of Supporters Staged Overnight Protests On The Streets Of Barcelona Over Punishment For Leaders Demanding An Independent Catalonia

स्वतंत्र कॅटालोनियाची मागणी करणाऱ्या नेत्यांना झालेल्या शिक्षेमुळे बार्सिलोनाच्या रस्त्यावर लाखो समर्थकांची रात्रभर निदर्शने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्सिलोना : स्पेनमध्ये कॅटालोनियाच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या १२ दिग्गज नेत्यांना शिक्षा ठोठावल्याच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. बार्सिलोनामध्ये एक लाखाहून जास्त लोकांनी रात्री रॅली काढली होती. एवढेच नव्हे तर विमानतळाला घेराव घातला होता. त्यामुळे १०० वर उड्डाणे रद्द करण्यात आली होती. निदर्शकांनी रेल्वेमार्ग, रस्ते जाम केले जात होते. त्यामुळे निदर्शक व पोलिसांत धुमश्चक्री उडाली होती. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॅटालोनियाच्या १२ नेत्यांना दोषी ठरवून ९ ते १२ वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावली होती. नेत्यांवर कॅटालोनियाला स्पेनपासून तोडण्यासाठी २०१७ मध्ये बेकायदा जनमत चाचणी केल्याचा ठपका होता. आरोपींमध्ये कॅटालोनियाचे माजी उपनेता आेरियल जंक्वेराज यांचा समावेश आहे. कोर्टाने त्यांना १३ वर्षांची शिक्षा ठोठावली.

असे आहे कॅटालोनिया : कॅटालोनिया सुमारे ३२ हजार १०८ चौरस किमी क्षेत्रफळ आहे. लोकसंख्या सुमारे ७६ लाखांवर आहे. या प्रांतावर स्पेनचे नियंत्रण आहे. येथील लोक स्वत:ची स्वतंत्र समुदाय अशी आेळख सांगतात. या समुदायाच्या नेत्यांनी २ वर्षांपूर्वी कॅटालोनियाला स्वतंत्र घोषित केले होते.

विमानतळाला घेरले, १०० उड्डाणे रद्द; रेल्वे, रस्ते जाम
छायाचित्र बार्सिलोनाचे आहे. नेत्यांच्या शिक्षेविरोधात लोकांनी मुख्य मार्गावरील वाहतूक रोखली होती.