आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चासाठी एमआयएम-वंचित बहुजन आघाडी-भारिप-बमसं एकत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला : भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची साथ साेडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सहभागी हाेतील असा दावा कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केला असतानाच अाता अकोल्यात एमआयएम, भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. आंबेडकर यांच्याच नेतृत्वात मुस्लिम अारक्षण महामोर्चा काढण्यात येणार अाहे. २७ डिसेंबर राेजी निघणाऱ्या या महामाेर्चाची तयारीही सुरू झाली अाहे. त्यामुळे या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघणार अाहे. परिणामी काँग्रेसच्या काही नेत्यांनी धसका घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

 

अापल्या न्याय्य हक्कांसाठी अाता मुस्लिम समाज सज्ज झाला अाहे. गतवर्षी तत्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाविरोधात सामाजिक संघटनांतर्फे अांदाेलन करण्यात अाले हाेते. विधेयकाचे कायद्यात रूपांतर हाेण्याच्या प्रक्रियेत िवराेधी पक्ष शांत राहिल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशाराही संघटनांकडून देण्यात अाला हाेता. दरम्यान मराठा, धनगर अारक्षणासाठी अांदाेलन सुरु असतानाच अाता मुस्लिम अारक्षणाची मागणी अधिकच जाेर धरत अाहे. या मागणीसाठी २३ नाेव्हेंबर राेजी शुक्रवारी धरणे अांदाेलन करण्यात अाले हाेते. 


काय अाहेत त्या समित्यांच्या शिफारशी :

मुस्लिम अारक्षणाबाबत डाॅ. महमूद उर रहमान व रंगनाथ मिश्रा समित्याच्या शिफारशींबाबत उल्लेख करण्यात अाले अाहे. डाॅ. महमूद उर रहमान समितीने ८ ते १० टक्के आणि रंगनाथ मिश्रा समितीने १० टक्के अारक्षणाची शिफारस केली हाेती. त्यामुळे अाता या दाेन्ही समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजानेही अाता अारक्षणाची मागणी लावून धरली. 


हे नेते हाेणार सहभागी :

मुस्लिम अारक्षण महामाेर्चा फतेह चाैक,शास्त्री स्टेडियम येथून २७ डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजता निघणार अाहे. महामोर्चात एमआयएम, भारिप-बमसं, वंचित बहुजन अाघाडीचे प्रमुख नेते सहभागी हाेणार अाहेत. मुस्लिम समाजाला अारक्षण मिळावे यासह इतरही मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात येणार अाहे. महामोर्चात माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अावाहन भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केले अाहे. या महामोर्चात एअायएमअायएमचे दिग्गज नेते सहभागी हाेणार असल्याचा दावा अकाेट येथील सादिक इनामदार यांनी केला अाहे. 


...तर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होणार 
मुस्लिम समाजासाठी भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरण्याचा फटका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अाघाडीला बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत अाहे. िवविध मुद्द्यांवर मुस्लिम समाजाला आकृष्ट करण्यात भारिप-बमसं-वंचित बहुजन आघाडीला यश अाल्यास काँग्रेस-राकाँ अाघाडीची मते भारिप-बमसंकडेच वळणार अाहेत. याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला हाेणार असल्याचे गत निवडणुकीत प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास दिसून येईल. भाजपचे संजय धाेत्रे यांना ४ लाख ५६ हजार ४७२, काँग्रेसचे हिदायतउल्ला पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ आणि भारिप-बमसंचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ३८ हजार ७७६ मते मिळाली हाेती. 


या अाहेत मागण्या 

मुस्लिम अारक्षण महामाेर्चाच्यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्या करण्यात येणार अाहे. शैक्षणिक व नाैकऱ्यांमध्ये अारक्षण देण्यात यावे. सच्चर समितीच्या शिफारशी लागू करा. मुस्लिम बहुल भागात विकासाची कामे तातडीने सुरु करावीत. मुस्लिम शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्यात येऊ नये. मुस्लिम समाजातील गरीब, अशिक्षितांना निराश करू नये. 
 

बातम्या आणखी आहेत...