विधानसभा 2019 / भाषण ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात ओवेसींनी 6 तास वाट पाहायला लावली, 6 मिनिटांत भाषण उरकून निघून गेले

भर उन्हात नागरिक त्यांना ऐकण्यासाठी सहा तास सभा ठिकाणी थांबून होते

दिव्य मराठी वेब टीम

Oct 13,2019 03:37:00 PM IST

अकोला- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींची काल(12 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता अकोल्यात सभा आयोजित केली होती. पण, सभेला ओवेसी तब्बल 6 तास उशिराने आले आणि भर उन्हात त्यांना ऐकण्यासाठी सहा तास उभे असलेल्या नागरिकांसाठी फक्त 6 मिनिटे भाषण करुन निघून गेल्याने वाट बघणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला.

एमआयएमची काल बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. रेहमान खान यांच्यासाठी सकाळी 11 वाजता सभा आयोजित केली होती. सभेला पक्षप्रमुखे असदुद्दीन ओवेसी येणार होते. पण, त्यांचे हेलिकॉप्टर उशिरा पोहोचल्याने बाळापूरच्या सभा स्थानी ते 3.50 वाजता पोहोचले. सभास्थळी येताच त्यांनी थेट माईक हातात घेऊन भाषणाला सुरुवात केली आणि अवघ्या 6 मिनीटात भाषण आटपून निघून गेले. त्यामुळे नागरिकांचा खूप हिरमोड झाला.

X
COMMENT