आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एबीव्हीपीवर बंदी घाला, एमआयएम विद्यार्थी आघाडीचे औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर जोरदार आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी प्रदेशअध्यक्ष डॉ.कुणाल खरात यांच्या नेतृत्वात एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. जेएनयू मध्ये झालेल्या अभाविप व हिंदुत्व वादी संघटनेच्या हिंसाचारविरोधात एमआयएम विद्यार्थी आघाडीने अभाविप वर बंदी घालावी यासह विविध मागण्यासंदर्भातील निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
धर्मांध संघटनांकडून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून देशात अराजकता माजविली जात आहे. परदेशांतून भारतात शिकण्यासाठी मोठ्या संख्येने विदेशी विद्यार्थी येतात. जमिया विद्यापीठ व जेएनयूतील हिंसाचारामुळे जगभरात भारताची प्रतिमा डागाळली जात आहे. आरएसएसशी संलग्नित धर्मांध संघटना सातत्याने धर्माच्या नावावर देशातील अल्पसंख्याक घटकावर दडपशाही करत आहेत देशात यामुळे स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.अभाविप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व तत्सम कथित हिंदुत्ववादी आरएसएस या संघटनांवर तातडीने बंदी आणावी, जमिया मिलिया इस्लामीया व जेएनयू तील हल्लेखोरांना तातडीने अटक करून अभाविप व पोलिसी गणवेशातील गुंडावर कारवाई करावी, दिल्ली विद्यापीठासह देशातील सर्व विद्यापीठातील पोलिसी हस्तक्षेप थांबवावा अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मोदी-शहा चले जाव, धर्म के नाम पर हिंसा नहीं चलेगी, हिटलरशाही मुर्दाबाद अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.बातम्या आणखी आहेत...