आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा; लढवय्या म्हणून एमआयएमने पाठिंबा दिला : इम्तियाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे तत्कालीन आमदार इम्तियाज जलील, शिवसेना सोडून बाहेर पडलेले हर्षवर्धन जाधव हे दोघेही मिळून पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे होते. अनपेक्षितपणे हर्षवर्धन यांनी तब्बल २ लाख ४३ हजार मते घेतली अन् याचा फायदा एमआयएमला झाला. इम्तियाज खासदार झाले, याची परतफेड म्हणून की काय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष असलेले इम्तियाज यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. हर्षवर्धन कन्नडमधून अपक्ष निवडणूक लढत आहेत. येथे आमच्या पक्षाचा उमेदवारच नसल्याने आपण पाठिंबा दिल्याचे इम्तियाज यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मला याची कल्पनाच नव्हती, ऐकून गंमत वाटली, मलाच काही कळेना, परंतु त्यांनी पाठिंबा देणे म्हणजे माझ्यासाठी भुशात लाडू सापडण्यासारखे आहे, मी त्यांचा आभारी आहे.
 हर्षवर्धन हे लोकसभेच्या रिंगणात नसते तर तुम्ही खासदार होऊ शकला नसता, हे उघड सत्य आहे, त्याचे पापक्षालन करण्यासाठीच तुम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे, हेही उघड सत्य आहे, हे तुम्हाला मान्य आहे का, असा थेट सवाल दिव्य मराठीने केला तेव्हा इम्तियाज यांनी काही सेकंद शांत विचार करत, नाही असे काही नाही, हर्षवर्धन हे लढवय्ये आहेत, ते जनतेच्या प्रश्नांवर पोटतिडकीने बोलतात, त्यांना लोकांची नस कळाली आहे, म्हणून पाठिंबा दिल्याचा खुलासा केला. 

बातम्या आणखी आहेत...