आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीचा मेंदू वाचणारा एक्जोस्केलेटन, याच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीलाही चालता येईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रांसमध्ये अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या 28 वर्षीय थिबॉल्ट मेंदूला नियंत्रीत करणाऱ्या ‘एग्जोस्केलेटन’च्या मदतीने परत चालू शकत आहेत. या यशाबाबत शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की, यामुळे अर्धांगवायू झालेल्या रुग्णाला आधीसारखे बनवू शकते. एग्जोस्केलेटन टेक्नोलॉजीच्या मदतीने थिबॉल्टला नवीन आयुष्य मिळाले. नाइट क्लबमध्ये एका अपघातानंतर त्याच्या संपूर्ण शरीराने काम करणे बंद केले होते.
टेट्राप्लेजिक त्या लोकांना म्हटले जाते, ज्यांना एखाद्या अपघाताने किंवा आजारामुळे अर्धांगवायू होतो आणि त्यांचे चालण्या फिरण्याची क्षमता नष्ट होते. रुग्णाला एग्जोस्केलेटनचा वापर करण्यासाठी अनेक महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. थिबॉल्टला त्याच्या मेंदूच्या मदतीने या मशीनला कंट्रोल करणे शिकवण्यात आले.

अॅडवांस्ड व्हर्जन पूर्णपणे काम करेल
याचे परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, या उपकरणाला अजून सार्वजनिक केलेले नाहीये. शोधकर्त्यांचे म्हणने आहे की, 65 किलोचे हे एक्सोस्केलेटन पूर्णपणे काम करू शकत नाही, सामान्य शरीराप्रमाणे विचाराच्या जोरावर अंगाची मुव्हमेंट करू शकेल. तसेच, येणाऱ्या काळात याचे अॅडव्हान्स व्हर्जन पूर्णपणे काम करेल.